६४ डॉ. बाबासाहेब आंबेडकर लेखन आणि भाषणे
किंवा मुसलमान झाला असतां त्याला त्याचा विटाळ न मानतां समाजामध्ये वागविण्यांत येतें, परंतु अस्पृश्यांची अस्पृश्यता ते हिंदुधर्मात असतांनाच नाहींशी करा म्हटलें कीं, स्मृतिपुराणादि ग्रंथांतले शास्त्राधार, लटपटपंचीचे कोटिक्रम, ढोंगीपणाचीं बोलणीं पुढें आलींच! ब्राह्मण आदिकरून उच्च म्हणविणाऱ्या जातींच्या लोकांनीं स्मृतिग्रंथांना, शास्त्रांना, रूढींना आपल्या सोयीप्रमाणे केव्हांच धाब्यावर बसविलें आहे. ज्या धर्मशास्त्रांचा अस्पृश्यतेचे समर्थन करण्यास ते आधार दाखवितात त्या धर्मशास्त्रांतले स्वतःला गैरसोयीचे असणारे नियम ते कधीच पाळत नाहींत. परंतु बहिष्कृतांना मात्र शास्त्राचा व रूढीचा मोठा बाऊ करून दाखवावयाचा ! हल्लीं खिस्ती मुसलमानांच्या, विशेषतः मुसलमानांच्या चढाईच्या धोरणामुळें उच्चवर्णीय म्हणविणाऱ्या लोकांना हिंदूंचे संख्याबळ कमी होत आहे या गोष्टीची जाणीव होत आहे आणि तसें होऊ नये म्हणून त्यांनीं संघटना व शुद्धि या चळवळीच्या द्वारे धडपड चालविलेली आहे. परंतु सध्याच्या
संघटण व शुद्धि या चळवळी म्हणजे संभावित लफंगेगिरी
आहे. मानवी हक्कांच्या पवित्रतेची जेथे भावना नाहीं, जेथें अन्यायाची व आप्पलपोटेपणांची चीड नाहीं, जेथे समतेच्या इष्टतेविषयी जळजळीत आस्था नाहीं तेथे संघटन व शुद्धि म्हणजे नुसते फार्स आहेत! या नाटकांवर बहिष्कूत वर्गाचा विश्वास नाहीं हें सांगावयास नको. ' तुम्ही आम्ही एक आणि कंठाळिला मेख ' त्यांतले हें संघटन आहे आणि सध्याची शुद्धि म्हणजे 'परभारा पावणेतेरा' पैकीं प्रकार आहे. उघड विरोध करणारे पुराणमतवादी पतकरले. परंतु शुद्धिसंघटनवाले हे ढोंगी म्हणून अधिक भयंकर होत. बहिष्कृतांच्या स्वाभिमानपर चळवळीचा द्वेष करणारे, खऱ्या समाज सुधारणेवर आणि उदार मतवादावर चोरटे हल्ले करणारे लोक हेच सध्यां संघटनवाल्यांत शिरले आहेत. ब्रह्मीभूत स्वामी श्रद्धानंद यांच्या पवित्र चळवळीचा या ढोंगी लोकांनीं विचका करून टाकला आहे. APA, पोटभरू व फुकटची आत्मप्रतिष्ठा वाढवून घेणारे लोक या चळवळींत भरले आहेत. हिंदु-मुसलमानांत भांडणे लावून देणें
हा धंदाच झाला आहे. त्यांना लाथा मारून बाहेर हांकून लावल्याशिवाय त्या चळवळीला खरा जोर केव्हांही येणार नाही. हे निर्लज्ज लोक बहिष्कृतांनी सध्याच्या स्थितीस कंटाळून परधर्मात जाण्याची गोष्ट काढली कीं जा, तुम्हीं खुशाल परधर्मात जा, आम्हाला तुमची पर्वा नाहीं, तुमच्या धमक्या आम्ही ऐकून घेणार नाहीं, तुम्हाला हिंदुसमाजात राहावयाचे असेल तर आम्हीं वागवूं तसेंच वागवून धेतले पाहिजे, असें म्हणावयास कमी करीत नाहींत. बहिष्कृत लोकांची इच्छा कोणालाही धमक्या देण्याची नाहीं, ते परधर्मात जाणे बरें असें म्हणतात तें