हिंदुधर्माला नोटीस - Page 107

६५ हिंदुधर्माला नोटीस !

परंतु त्या म्हणण्याचा अर्थ जाच असह्य झाल्यामुळेंच म्हणतात. हिंदुसमाजांतील

लोक उलट धमकावण्या दाखवितात. तसें धमकी असा करून हे स्वार्थी लबाड

वर्ग सामाजिक जुलुमाला करावयाला ते धजतात, याचें कारण असें कीं बहिष्कृत

कितीहि कंटाळलेला असला तरी त्याचें हिंदुधर्मावर प्रेम आहें. व त्या प्रेमाखातर

असाच जांच हे यापुढेहि सोसतील असें त्यांचे मन त्यांना सांगत असतें. परंतु

या ढोंगी लोकांच्या धमकावण्या बहिष्कृत लोक आतां साफ ऐकून घेणार नाहींत, असें जळगांवचे लोक कृतीनें दाखवून देणार आहेत. या पांच हजार लोकांनी धर्मांतर केलें तर त्याची जबाबदारी सर्वस्वी हिंदुसमाजावर आणि विशेषत: बहिष्कृतांना धमकावूं पहाणाऱ्या ढोंगी संघटनवाल्यांवर आहे, हें आम्ही अगोदरच सांगून टाकतों. आम्ही स्वत: धर्मातर करण्यास आज तरी तयार नाहीं, कारण उन्मत्त लोकांची खोड मोडून हिंदुसमाजांत बहिष्कृत वर्गाचे माणुसकीचे हक्क प्रस्थापित करण्याची अद्यापि आम्हांस धमक आहे व हिंदु समाजाचा मुर्दाडपणा चालविण्यांत यश येईल अशी अद्यापि आम्हांला आशा आहे. तथापि,

हिंदुसमाजाचा कंटाळा येऊन हिंदुधर्माचा त्याग करण्यास जे प्रवृत्त झाले असतील

त्यांना, 'तुम्ही असें करू नका,' असें सांगावयाला आमचें मन घेत नाही. ज्याच्या

त्याच्या सोशिकपणाचा हा प्रश्‍न आहे तथापि जळगांवच्या पांच हजार महार बंधूंना

एक सूचना देणें मात्र आम्हाला इष्ट वाटतें ती ही कीं, तुम्हाला

धर्मांतरच करावयाचें असले तर मुसलमान व्हा

तुम्हाला मोक्षासाठी धर्मांतर करावयाचें नाही. कोणत्या धर्माचीं तत्त्वें विशेष

संयुक्तिक आहेत या विषयीचा हा प्रश्‍न नाहीं. तर धर्मांतर करण्यांत आपली

अस्पृश्यता घालविणें, हाच तुमचा उद्देश आहे. हा उद्देश प्रार्थना समाजिस्ट किंवा

आर्य समाजिस्ट अगर बौद्ध धर्मीय होऊनहि साधावयाचा नाही. कारण तुम्ही

व्यवहारदृष्ट्या हिंदुच समजलें जाल आणि अस्पृश्यतेचे तुमच्या मानेवर असलेलें

जोखड तुमच्या मानेवर कायमचे राहील. इतकेंच नव्हे तर खिस्ती होऊनहि

तुमची अस्पृश्यता पूर्णपणे निघून जाणार नाहीं. हिंदी खिस्त्यांनाहि जातिभेदानें

साफ सोडलेलें नाही. मुसलमानी धर्मात मात्र सर्वाना आत्मसात्‌ करण्याचे

सामर्थ्य आहे. मुसलमान समाज स्वकीयांविषयी जाज्वल्य अभिमान बाळगणारा

व स्वकीयांच्या सहाय्याला धांवून जाणारा आहे. म्हणूनच सात कोटी मुसलमान

बावीस कोटी हिंदूंना भारी झाले आहेत. तुम्हीं मुसलमान झाल्यावरहि उन्मत्त

हिंदु लोक तुम्हांला हिडिस फिडीस म्हणून वागवूं पाहतील तर तुमच्या पाठिमागे

असणाऱ्या सात कोटी मुरःलमानांशीं त्यांना सामना करावा लागेल आणि भ्याड

हिंदु लोक तसा सामना करावयाला केव्हांहि तयार होणार नाहींत. तुमच्याकडे