६६ डॉ. बाबासाहेब आंबेडकर लेखन आणि भाषणे
वाकड्या डोळ््यानें पाहण्याची त्यांना छाती होणार नाहीं व तुम्ही मुसलमान झालां कीं तुम्हांला 'भाई भाई ' म्हणून मिठ्या मारावयाला, इतकेंच नव्हे तर तुन्हांला खिलाफत पाहिजे असल्यास तुमच्यासाठी तुरुंगांत जावयालाहि एखादा 'शंकराचार्य' 'खिलाफतीच्या चळवळींत, कराची येथें झालेल्या खटल्याने दिसून आलें त्याप्रमाणें, तयार होईल आणि तुमच्या सभांमध्ये तुमच्यांपेक्षांहि मोठ्याने ओरडून अल्ला हो अकबर ' असा हिंदु लोक जयघोष करतील |
त न त तल त तर ता मन EA AE
अग्रलेख : बहिष्कृत भारत, ता. १५ मार्च १९२९.