22
सायमन कमिशनला [लोटांगण ] [घालणारे ] [ब्राह्मण ]
सायमन कमिशन मद्रासला 'गेल्या वेळीं तेथल्या सनातनी ब्राह्मणांचे एक शिष्टमंडळ त्यांच्या भेटीला गेलें होतें. हे सनातनी ब्राह्मण म्हणजे श्री. श्रीनिवास अय्यंगार व श्री. सत्यमूर्ति या ज्वलज्जहाल निर्भेळ स्वातंत्र्यवादी पुढाऱ्यांचे जातभाई या सनातनी ब्राह्मणांची बाजू घेऊन सदरील काँग्रेसवाले पुढारी समाज सुधारणेच्या कायद्यांना विरोध करितात. देवस्थानें व मठ यांच्यासंबंधाचा जो उपयुक्त कायदा त्या वेळच्या मंद्रास येथील ब्राह्मणेतर मंत्रिमंडळाने केला, त्याच्याविरूद्ध सनातनी ब्राह्मणांची बाजू सत्यमूर्ति प्रभृति पुढाऱ्यांनी हाकाटी केली होती, आजहि त्या कायद्याला त्या पक्षाचा विरोध आहे आणि तो कायदा रद्द करण्यासाठीं केलेले आटोकाट प्रयत्न निष्पळ झालें तरी अद्यापि ते चालूच आहेत. मद्रासी ब्राह्मण राजकीय बाबतींत स्वातंत्र्याच्या व स्वराज्याच्या गोष्टी चुरचुर बोलण्यांत पटाईट आहेत, परंतु सामाजिक बाबतींत त्यांच्यासारखे पुच्छ प्रगतीचा पुरस्कार करणारे लोक साऱ्या दुनियेत सांपडावयाचे नाहींत. धार्मिक व सामाजिक बाबतींत त्यांच्यासारखे अनुदार तेच. मद्रास इलाख्याला 'सागासलेला प्रांत' (benighted presidency) असें नांव मिळावयाला तेथल्या ब्राह्मणांचे सामाजिक व धार्मिक बाबतींतील मागासलेले धोरणच कारण आहे. स्पर्शास्पर्शाचें तर बेट्यांनी एक भलें मोठे शास्त्रच बनविलें आहे! कोणत्या जांतीचा किती यार्डाच्या अंतरावरून विटाळ मानावयाचा त्यांची जंत्री तयार करणें, दृष्टिदोष
आदि करून नवीन नवीन दोष ऊर्फ विटाळ शोधून काढणें, असल्या कामांत मद्रासी
ब्राह्मणांनी आजपर्यंत आपली बुद्धि खर्चिली आहे. या बुद्धिचा उपयोग जर
भौतिक शास्त्राचे शोध लावण्यांत झाला असता तर साऱ्या देशार्चे दारिद्रय दूर
झाले असतें. सध्यां देशांत समाजसुधारणेचा मार्ग कायद्याने सुलभ करण्याचे
जे प्रयत्न होत आहेत त्यामुळें मद्रासच्या सोंवळ्या ब्राह्मणांची तिरपीट उडून गेली
आहे. आतां आपले वर्चस्व नाहीसे होणार, आणि तसें झालें म्हणजे हिंदुधर्म
रसातळाला जाणार, असें त्यांना वाटूं लागलें आहे. सायमन कमिशनवर
बहिष्कार घालण्यांत श्रीनिवास अय्यंगार, सत्यमूति, सांबमूर्ति वगैरे ब्राह्मण
पुढारी असूनही मद्रास येथें सायमन कमीशन गेले त्यावेळी त्यांच्यापुढे लोटांगण
घालण्यास सनातनी ब्राह्मणांनी कमी केलें नाहीं. त्यांच्या वतीने भांडून काँग्रेसचे
ब्राह्मण पुढारी समाजसुधारणेला विरोध करितात त्यांनाही ते पुढारी बहिष्काराच्या