सर जान सायमन व अस्पृश्य वर्ग - Page 111

| . २३ क

सर जॉन सायमन व अस्पृश्य वर्ग.

सायमन कमिशनकडे वर सांगितल्याप्रमाणें सनातनी ब्राह्मणांचे शिष्टमंडळ गेलें ` होतें त्याचा ब्राह्मणी पत्रांनी एवढा गवगवा केला नाहीं: परंतु उटकमंड येथें सायमनसाहेबांना अस्पृश्य वर्गाने. मानपत्र दिलें त्यावेळीं उत्तर देताना, अस्पृश्य वर्गाचा प्रश्न हा मुख्यत्वेंकरून सामाजिक स्वरूपाचा आहे, राजकीय स्वरूपाचा नाहीं, असें सायमनसाहेब म्हणाले व तसें बोलून त्यांनी पर्यायानें असें दर्शविलें कीं, राजकीय घटनेचा विचार करण्याकरितां नेमलेल्या कमिशनला अस्पृश्यांसंबंधीचा प्रश्न समाधानकारक रीतीनें सोडविणें शक्य नाहीं, या गोष्टीचा मोठा गवगवा करून अस्पृश्य वर्गाला सामयन कमिशनशी सहकारिता केल्याबद्दल हिणविण्याचा प्रयत्न चालू आहे. सायमन कमिशनशी सहकारिता केली म्हणजे आपला अस्पृश्यतेसंबंधोचा प्रश्न सुटेल अशी अस्पृश्य वर्गाची केव्हांच समजूत नव्हती, आणि सामाजिक प्रश्न सोडविण्याचे काम राज्यघटना ठरविण्याकरितां नेमलेल्या कमिशनकडून समाधानकारक रीतीनें होणें शक्य नाहीं हें सर जॉन सायमन यांनीं तसें सांगण्यापूर्वीहि अस्पृश्य वर्गाच्या पुढाऱ्यांना माहित होते. सायमन कमिशनवर बहिष्कार घालण्याच्या चळवळींत अस्पृश्यवर्ग कां सामील झाला नाहीं त्यांचीं कारणें उघड आहेत. अस्पृश्य वर्गाचे प्रश्न, त्यांच्या अडचणी, त्यांच्या आपत्ती इतरांच्या पेक्षां अगदीं वेगळ्या स्वरुपाच्या असून त्यांच्या निरसनार्थ देशांतील लोकांकडून म्हणण्यासारखे कांहींहि प्रयत्न झालेले नाहींत आणि अस्पृश्यतेचा प्रश्न जरी मुख्यतः सामाजिक स्वरूपाचा असला तरी तो सोडविण्यास राजकीय उपायाचा थोड्याबहुत प्रमाणाने उपयोग होण्यासारखा आहे. हिंदी लोकांना स्वराज्याचे विशेष हक्क देण्याचा प्रश्न जेव्हां ब्रिटिश पार्लमेंटापुढें येईल तेव्हां अस्पृश्यांच्या अडचणीकडे लक्ष देऊन, त्यांची प्रगती सुगम होईल अशा दृष्टीनें, स्वराज्याची घटना तयार करण्यांत यावी, या उद्देशानें, सायमन कमिशन- पुढें आपले म्हणणें मांडणें अस्पृश्यवर्गाच्या पुढाऱ्यांना इष्ट वाटलें. मुसलमान, ब्राह्मणेतर, जमीनदार वगेरे वर्गानी सायमन कमिशनवर बहिष्कार घातला नाहीं, इतकेच नव्हे तर सनातनी ब्राह्मणसुद्धां कमिशनपुढें लोटांगणें घालीत गेले. मग ` अस्पृशंनी तरी मागें कां रहावे ? बहिष्काराची चळवळ ही पुढारलेल्या वर्गाची होती आणि पुढारलेल्या वर्गावर आतांपर्यंतच्या अनुभवावरून बहिष्कृत वर्गाचा विश्वास नाही. अस्पृश्यवर्गानें मागण्या केल्यावर कमिशनने त्या तत्काळ कबूल कराव्या