सर जान सायमन व अस्पृश्य वर्ग - Page 112

७० l डॉ. बाबासाहेब आंबेडकर लेखन आणि भाषणे

अशी आम्ही तरी अपेक्षा केली नव्हती. सर जॉन सायमन यांनीं उटकमंड येथें अस्पृश्यांच्या मानपत्राला दिलेले उत्तर आमच्या दृष्टीनेंही समांधानकारक नाहीं, राजकीय व सामाजिक बाबींमधला संबंध सर जॉन सायमन यांच्या लक्षांत यावा तसा आला नाहीं, हें खरे असलें तरी तेवढ्यावरून अस्पृश्यांना ते कमिशनवरील बहिष्काराच्या चळवळींत सामील झालें नाहींत म्हणून ही संधी साधून हिणविणें शहाणपणांचें ठरत नाहीं. शिवाय, अशा प्रकारें हिणविण्याचा प्रयत्न करणाऱ्या लोकांना “ He laughs best who laughs last” (शेवटी हंसेल तोच खरा) या इंग्रजी म्हणीचीहि आम्हीं आठवण देतों.

RRS

प्रासंगिक विचार : बहिष्कृत भारत, ता. १५ मार्च १९२९.