हिंदुधर्म व अस्पृश्यता - Page 114

२३

. हिंदुधर्म व अस्पृश्यता

नुकतेच रंगून येथील एका जाहीर सभेमध्ये भाषण करतांना महात्मा गांधी म्हणाले, “सांप्रत जगांतील वेगवेगळ्या धर्मांमध्ये स्वतःचा जीव जगविण्यासाठी जी शर्यत लागलेली आहे तीमध्ये एक तर हिंदुधर्माने नामशेष झालें पाहिजे किंवा

अस्पृश्यतेचे तरी पूर्ण निर्मूलन झालें पाहिजे. अस्पृश्यतेचे पूर्ण निर्मूलन झालें तरच अद्वितवादी हिंदुधर्माचा व्यवहारांत प्रत्यय येऊ शकेल." . (In the race of life in which all the religions of the world are today engaged, 1 think; either Hinduism has got to perish or untouchability has to be routed out completely, so that the fundamental fact of Advaita Hinduism may be realised in practical life) महात्माजींचें हें मत किती हिंदु लोकांना पटत असेल? आतांपर्यंत त्यांनीं अस्पृश्यतेचा निषेध केला आहे, परंतु. या बाबतींतील त्यांची चळवळ. जवळ VIS .अरण्यरूदनवत झाली आहे. महात्माजींच्या सांगण्यावरून आतां ठिकठिकाणीं परदेशी :कपड्यांच्या' होळ्या पेटविल्या जात आहेत. . तें सोपें-काम करणारे कितीसे देशभक्त अस्पृश्यतेची होळी करावयास तयार आहेत ? अद्वैत वादाचा -शंखहि 'कलौ वेदान्तिनो भान्ति फाल्गुने बालका इव' या सुभाषिताप्रमाणें देवळोदेवळीं, घरोघरीं ऐकूं येतो. परंतु पुराणांतलीं वागीं पुराणांत. : व्यवहारात अद्वैत वेदान्ताचामागमूसहि नाहीं, उलट द्वैत मात्र जिकडे तिकडे माजलेले आहे! |

प्रासागिक विचार : वहिष्कृत भारत, ता. १५ ATE १९२९,