गिरण्यांचे मालक व कामगार - Page 116

(७४ डॉ. बाबासाहेब आंबेडकर लेखन आणि भाषणे

कापडखात्यांत काम करण्याला जर कोणाची हरकत असेल तर ती मराठे वगैरे

कामगारांचीच आहें. आपल्या कडून केव्हाच हरकत नव्हती, असेहि मालकांनी

सांगितलें. खरें पाहिलें असतां .यात मालकांचाः प्रश्‍नच नव्हता. कापड

विणण्याचें काम स्पृश्यांनीं केलें काय किंवा अस्पृश्यांनी केले काय, मालकांना त्यांत

कांही सुखदुःख नाहीं, त्यांचा माल निघाला व त्यांना फायदा मिळाला म्हणजे झालें. बहिष्कृत वर्गातल्या लोकांबरोबर आपण कापडखात्यांत काम करणार नाहीं असें कापडखात्यांतले कामगार म्हणतात त्याला मालकांनी काय ` करावें ? त्रासन वगैरे इतर खात्यांत अस्पृश्य मानलेल्या माणसांना काम करतां येतें, परंतु कापड खात्यांत पगार अधिक मिळतो तेथें मात्र अस्पृश्यांना मज्जाव! कापड खात्यांत महार, चांभार काम करूं लागले तर मात्र मराठे वगैरे लोकांची जात बुडते ! काय म्हणे कापड खात्यांत सूत तोंडांत धरावें लागतें आणि त्यामुळें बाटाबाट होते | जणूं काय कापडखात्यांत काम. करणाऱ्या मुसलमानामुळें मराठ्यांची जात बुडत नाहीं ! मुसलमानांचें उष्टे सोवळें व अस्पृश्यांचे मात्र ओवळे? कमिटीने या बाबतींत निकाल देऊन न देऊन सारखा आहे. संप कमिटीने केलेली मागणी मालकांनी. कबूल केली आहे व मालकांची यापूर्वीहि केव्हां हरकत नव्हती. या मागणीची अंमलबजावणी ge कांमगारांच्याच हाती आहे. मंबई गिरणी कामगारसँघाने या बाबतींत कमिटीचा रिपॉर्ट बाहेर पडण्यापर्ठीच अस्पश्य मानलेल्या कामगारांच्या वतीनें प्रयत्न चालविला आहे. कित्येक गिरण्यांच्या मालकांनी अस्पृश्यांची कापड खात्यांत सोय करण्याचें कबूल केलें आहे. एकाद्या दुसऱ्या गिरणींत कापड खात्यांत एकजात अस्पृश्य ठेवले जाणें हें जेथे मुळींच प्रवेश नाहीं तेथे आपला हात शिरकावून घेण्याच्या दृष्टीने ठीक असले तरी सर्व गिरण्यांच्या कापड खात्यांचे दरवाजे बहिष्कृत वर्गाला खुलें होणे अत्यंत अवश्य आहे हे विसरतां कामा नयें. बहिष्कृत वर्गातल्या लोकांनी त्यासाठी जोरानें

चळवळ केली पाहिजे आणि मराठें वगैरे गिरणी कामगार आड येऊं लागल्यास

त्यांचा जोरानें प्रतिकार करण्यास, वेळी अडणुकीच्या मार्गाने. त्यांना वठणीस आणण्याला तयार असले पाहिजे. _लाल बावटेवाला म्हणून ओळखला जाणारा 'गिरणी कामगार युनियन संघ' या बाबतींत आतापर्यंत मुग्ध आहे, त्याच्या पुढाऱ्यांनी आपल्या अनुयायांना या बाबतींत योग्य शिकवण देण्याची इच्छा अद्यापि दर्शविलेली नाहीं. परंतु बहिष्कृत वर्गातल्या गिरणी कामगारांनी एकजूट करून स्वतच्या हक्कांसाठी शिकस्तीनें भांडण्याची तयारी दाखविल्यास विरूद्ध पक्षाला शेवटी नमतें घ्यावे लागेल अशी आमची खात्री आहे. त्याखेरीज, बहिष्कृत