गिरण्यांचे मालक व कामगार - Page 117

गिरण्यांचे मालक व कामंगार 19५

वर्गातल्या होतकरू कामगारांनी पुढें येऊन कापंडखात्यांतलें काम शिकण्याची इच्छा दर्शविली पाहिजे. त्याप्रमाणे तरूण होतकरू मंडळीनी आपलीं नांवें आमच्यापाशीं अर्थात्‌ दामोदर हॉलमध्ये गिरणी कामगार संघामध्यें नोंदल्यास त्यांना कापड खात्यांतले काम शिकविण्याची व्यवस्था करण्यासहि ठीक पडेल. असो. wise कमिटी मालकांच्या विणकरांचे पगार कापण्यासंबंधाच्या योजनेला संमति देते किंवा काय हें जाणण्याकरिता गिरणी कामगारांचें कमिटीच्या रिपोर्टाकडे डोळे लागून राहिले होते. पगारांची निरखबंदी (स्टँड्डायझेशन) करण्याची योजना HAA पसंत ठरविली आहे आणि. गिरण्यांच्या धंद्याला सध्या मंदी असल्यामुळें व असावी तितकी तेजी नसल्यामुळे विणकरांचे पगार शेंकडा ७11 टक्क्यांनीं कापणें गैरवाजवी होणार नाहीं असे मत दिलें आहे ; तथापि मालकांनी स्वतःच्या फायद्याकडे लक्ष देऊन विणकरांचे पगार छाटण्याची कल्पना अंमलांत आणू नये, कारण शेंकडा ७।। टक्के पगार कापून मजुरींत बचत झाल्यानें जो फायदा होईल त्यापेक्षा पगार कापले नाहींत व त्यायोगें निरखबंदीची योजना अंमलात आणावयाला कामगारांच्या पुढाऱ्यांची मदत मिळाली म्हणजे अधिक फायदा होईल, असें कमिटीने मुद्दाम म्हटले आहे. त्याशिवाय निरखबंदीची योजनाहि मालक येत्या ऑक्टोबरपर्यंत अंमलात आणीत नाहींत, असेहि प्रसिद्ध झाले आहे. एकंदरींत |

पगाराचे टक्के कापले जाण्याचा प्रसंग तूर्त टळला

असें म्हणावयास हरकत नाहीं. मालकांनीं निरखबंदीची जी योजना तयार केली आहे तिच्या अन्वयें सूतखात्यातल्या माणसांची सध्याची संख्या थोडी कमी होणार आहे परंतु सूत खात्यातले सध्या अगदींच हलके असलेले पगार थोडें वाढणार आहेत. कक्के छाटले जाण्याची भीति विणकरांच्या बाबतींत होती आणि

आजमितीस तर विणकरांमध्यें बहिष्कृत वर्गातले कोणी लोक नाहीत. तथापि,

विणकरांच्या पगारांत काट होण्याचा प्रसंग तूर्त टळला ही गोष्ट बहिष्कृत वर्गामधीलही गिरणीकामगारांच्या दृष्टीनें समाधानाची समजली पाहिजे. कारण, विणकरांचे पगार कापले गेले असते म्हणजे त्यांनी संप पुकारला असता आणि सर्व गिरण्यांची कापड खातीहि बंद पडल्यावर सूत खाती आपोआप बंद पडली असती व बहिष्कृत वर्गातल्या कामगारांवरहि उपासमारीचा प्रसंग आला असता. आधीच गेल्या बारा महिन्यांत सहा महिन्यांचा मोठा संप व नंतर झालेले वेगवेगळ्या गिरण्यातले फुटकळ संप यांच्या योगानें महिन्यांचे महिने खाडे होऊन बहिष्कृत वर्गातल्या गिरणीं कामगारांची स्थिति अतिशय हलाखीची झालेली आहे व त्यांच्या डोक्यांवर कर्जाचे भारे चढलेले आहेत. आधीच पगार फार थोडा व