७६ डॉ. बाबासाहेब आंबेडकर लेखन आणि भाषणे
त्यात वरचेवर संप यामुळे अशी स्थिति होणे स्वाभाविक आहे. . त्यांत आणखी या वेळी गिरण्यांच्या सार्वत्रिक संपाची भर पडली असती तर बहिष्कृत वर्गातील गिरणी. कामगारांच्या. हालांना सीमाच राहिली नसती. म्हणून विणकरांच्या 'पगारांना तूर्त तरी कात्री लागत नाहीं ही गोष्ट सूत खात्यांतल्या अर्थात बहिष्कृत वर्गातल्याहि -कामगारांच्या दृष्टीनें समाधानाची आहे. ' तथापि, एवढ्यावरून बेसावध'न राहतां बहिष्कृत वर्गातल्या गिरणी कामगारांनी गिरणी कामगार संघाचे सभासद होऊन आपली 'संघशक्ती वाढविली पाहिजे व आजमितीस त्यांना ज्या अडचणी व जीं दुःखें सोसावी लागत आहेंत तीं दूर करुन घेतली पाहिजेत.
-अग्रलेख.: बहिष्कृत भारत, ता. २९-मार्च. १९२९.