२७
हिंदु महासभा व अस्पृश्यता
नुकतेंच थोड्या दिवसांपूर्वी सुरत येथें हिंदुमहासभेचे अधिवेशन भरले आणि त्या अधिवेशनाबरोबरच, राष्ट्रीय सभेच्या बैठकीच्या निमित्ताने सामाजिक परिषद वगैरे परिषदा भरतात त्याप्रमाणें शुद्धि परिषद व अस्पृश्यतानिवारक परिषद या परिषदाहि भरल्या. सुरत येथे झालेल्या हिंदुमुसलमानांच्या दंग्यासंबंधाचें खटले . अजूनपर्यंत चालू असल्या कारणानें सुरतच्या हिंदुसमाजात हिंदु.महासभेविषयीं विशेष उत्साह असणें व त्या कारणास्तव चालू वर्षी सदई महासभेचे अधिवेशन तेथे भरणें हैं एका अर्थी स्वाभाविकच होते. तेथील हिंदुमहासभेच्या शाखेचे एक प्रमुख कार्यकर्ते डॉ. रायजी यांचे नांव त्यांच्यावरील हिंदुमुसलमानांच्या दंग्यासंबंधाच्या खटल्यांत हल्ली विशेष प्रसिद्धीस आले आहे व तेच स्वागत मंडळाचे प्रमुख होते. महासभेच्या अध्यक्षस्थानी कलकत्त्याच्या 'मॉडर्न Ray या सुप्रसिद्ध इंग्रजी मासिकाचे स्थापक व संपादक श्री.रामानंद चतर्जी यांची योजना झाली होती. श्री. चतर्जी हे नांवाजलेले लेखक असून स्वतंत्र विचार व स्पष्टवादित्व याच्याबद्दल त्यांची ख्याती आहे. ते ब्राह्मसमाजाचे अनुयायी आहेत आणि सामाजिक बाबतींतील त्यांचे विचार पहिल्यापासून सुधारणेला अनुकूलच नव्हेत तर कट्टे सुधारणावादी आहेत. अशा गृहस्थांची हिंदुमहासभेच्या अध्यक्षस्थानी योजना झाली हें एक प्रकारें आश्वर्यच समजलें पाहिजे. अपेक्षेप्रमाणे त्यांचे भाषण सडेतोड झालें. जातिभेद व अस्पृश्यता या हिंदुसमाजाला लागलेल्या महारोगाचे पूर्ण निर्मूलन झालें पाहिजे, असें श्री. चतर्जी यांनी प्रतिपादिलें. त्यांनी आपल्या भाषणांत हिंदुसमाजाच्या डोळ्यांमध्ये झणझणीत अंजन घातलें खरें, परंतु तें कितपत लागू पडलें असेल याची आम्हाला शंकाच वाटते. कारण
हिंदुसमाज कलपनातीत कोडगा
आहे. वरीलसारखी भाषणें ऐकताना टाळ्या वाजविण्यास सुद्धा तो कमी करणार नाहीं, इतकेंच नव्हे तर तसे विचार प्रदर्शित करणाऱ्या माणसाला उच्चस्थानीं बसवील, परंतु आपला पूर्वीचा कार्यक्रम मात्र तसाच कायम ठेवील याची साक्ष गौतम बुद्धापासून महात्मा गांधीपर्यंतच्या काळाचा इतिहास देईल. गौतम
वाय ६४१-८