हिंदु महासभा व अस्पृश्यता - Page 121

' हिंदु महासभा व अस्पृश्यता ७९

त्याप्रमाणें वाटेल.तशी तडजोड करणें आणि आलेली वेळ कशीबशी मारून नेणें हा हिंदुसमाजाचा जन्मस्वभावच आहे. या लवचीकपणामुळेंच, 'महापुरें झाडें जाती! तेथे लोहाळे वांचती' या न्यायाने तो आतापर्यंत टिकून राहिला. बाकी,

असले जगणें कितपत श्रेयस्कर

आहे हा प्रश्न अलाहिदा. हा लवचीकपणा केवळ तात्पुरत्या आत्मसंरक्षणालाच उपयोगीं पडूं शकतो. समाजपुरुषाची शरीरप्रकृती निकोप होण्यास आणि त्याचें सामर्थ्य वाढण्यांस त्याच्या शरिरांतील सर्व दोष अगोदर निघून गेले पाहिजेत. सुरत येथील हिंदुमहासंभेच्या वेळी: अस्पृश्य मानलेल्या लोकांची स्पृश्यांसहीत एक मिरवणूक. काढण्यांत आलीं. या मिरवणुकीमध्ये सुमारें पांचशेंच लोक होते आणि स्पृश्य व अस्पृश्य यांच्या एकत्र मिरवणुकीनें हिंदुधर्मावर कांहीं प्राणसंकट ओढवले नसतें, इतकेच नव्हें तर हिंदुधर्माचे मरण अशानें थोडें लांबणीवरच पडेल. परंतु तेंहि कांहीं सोवळ्या लोकांना खपलें नाहीं. वैष्णव म्हणविणाऱ्या सुरतेच्या कांहीं लोकांनीं या मिरवणुकीविरुद्ध हस्तपत्रकें वांटून, हा भयंकर अधर्म होत आहे, अशी ओरड केली. आम्हांला या वैष्णव म्हणविणाऱ्या लोकांची खरोखरच कींव येते. .

' विष्णुमय जग वैष्णवांचा धर्म | भेदाभेदअम अमंगळ '

असें तुकोबारायासारख्या महावैष्णवांनीं कितीहि कानीं कपाळीं ओरडून सांगितलें अथवा ' विप्राव्दिषड्गुणयुतादरविन्दनाभ- | पादारविंदविमुखात्‌ श्वपचं वरिष्ठम्‌' असें खुद्द भागवत पुराणामध्यें प्रतिपादण्यांत आलें तरी ज्यांचा जातिदुरभिमान नाहींसा होत नाहीं, ते वैष्णव नसून वैष्णव धर्माच्या नदींतले गोटे असें कां म्हणूं नये ? सुरत येथें हिंदुमहासभेबरोबर अछुतोद्धार परिषदहि भरविण्यांत आली आणित्यांत मामुली ठराव पसार झाले. अस्पृश्यांना शाळा, विहिरी व सार्वजनिक इमारती यांमध्यें मज्जाव नसावा अशी म्युनिसिपालिट्या, लोकलबोर्डस्‌ व इतर सार्वजनिक संस्था यांना विनंति करण्याबद्दलचा ठराव त्यांमध्यें होता. ह्या ठरावाच्या अंमलबजावणीकरितां हिंदुमहासभेच्या स्थानिक शाखांनीं कोठें कोठें प्रत्यक्ष प्रयत्न केले आहेत तें समजेल तर बरें होईल. सदरील अछूतोद्धार परिषद म्हणजे हिंदुमहासभेचेंच शेपूट होतें. अस्पृश्यांनीं स्वतःच्या पायावर उभे राहण्याकरितां जे प्रयत्न चालविले आहेत ते हिंदुमहासभेच्या पुढाऱ्यांना पसंत नाहींत, इतकेंच नव्हे तर हिंदु म. स. चे लोक अस्पृश्यांमध्यें फाटाफूट करण्याचे प्रयत्न मुद्दाम करीत असतात. आम्ही खुशीनें देऊ तेवढें अस्पृश्यांनीं घ्यावें, त्यांत समाधान मानून आमच्याविषयीं कृतज्ञता बाळगावी, आम्हीं जेथें बसा म्हणूं तेथें बसावें आणि उठा म्हटल्याबरोबर ' जी हुजूर ' म्हणून उठावे, असें