हिंदु महासभा व अस्पृश्यता - Page 122

डॉ. बाबासाहेब आंबेडकर लेखन आणि भाषणे

हिंदुमहासभावाल्यांचे अस्पृश्यांच्या बाबतींत धोरण !

४६. यायचो आणखी एक ताजी साक्ष पाहिजे असल्यास ती सुरतेच्या

5! सभेच्या अधिवेशनांत पसार झालेल्या अस्पृश्यताविषयक ठरावामध्यें सांपडेल. या ठरावांत अस्पृश्यांना देवळें, विहिरी, शाळा, सभा वगैरे ठिकाणी मज्जाव न करितां समतेनें वागविण्यांत यावें असें म्हणून अस्पृश्यांचे स्थानिक इरंस्थांमधील--म्युनिसिपालिट्या, लोकलबोर्डस्‌ वगैरेंमधील व त्याचप्रमाणें प्रांतिक कायदेकौन्सिलें व लेजिस्लेटिव्ह अँसेंब्ली यांमधील प्रतिनिधी सरकारनें नेमणे हें देशाच्या हिताला खुद्द अस्पृश्यवर्गाच्या स्वाभिमानाला विघातक आहे असें म्हटलें आहे. आम्हांलाहि सरकारनें अस्पृश्यांचे प्रतिनिधी. नेमणें हा गौण मार्गच दाटतो. तथापि, -हिंदुमहासभेनें हे प्रतिनिधी अस्पृश्यांसुद्धां सर्व हिंदूंनी निवडून द्यावयाचे कीं फक्त अस्पृश्यांनींच निवडून द्यावयाचे याविषयीं सदरील ठरावांत मुग्धता दाखविली आहे व तेथेंच सारें पाणी मुरत आहे. अस्पृश्यांसारख्या वर्गातल्या लोकांचे प्रतिनिधी सरकारनें नेमण्यांवर ज्या तत्वावर आक्षेप घेतां येतो त्याच तत्वावर मिश्रमतदारसंघातफ अस्पृश्यांच्या प्रतिनिधींची निवड होण्यावर आक्षेप घेतां येईल. इतकेच नव्हे तर, प्रस्तुतच्या परिस्थितींत मिश्रमतदारसंघांतफ अस्पृश्यांचे प्रतिनिधी निवडून येण्यापेक्षां त्यांची सरकारनें नेमणूक केलेलीच बरी, असें आमचें स्पष्ट मत आहे. हिंदुमहासभेला अस्पृश्यांच्या स्वाभिमानाची जर खरोखरच कळकळ होती तर तिनें अस्पृश्यांचे प्रतिनिधी त्याच वर्गातल्या खास मतदारसंघातफे निवडून येणें इष्ट आहे असें स्पष्ट म्हटले असतें. अस्पृश्यतेचा जेव्हां नायनाट होईल तेव्हां आम्हीही मिश्रमतदारसंघांना संमति देऊ. परंतु सध्याच्या परिस्थितींत इतर समाजावर विश्वास ठेवावयाला आम्हीं तयार नाहीं. सरकार व अस्पृश्य वर्ग यांचे हितसंबंध परस्परविरोधी नाहींत, परंतु अस्पृश्य वर्ग व इतर समाज यांचे हितसंबंध मात्र एकरूप नाहींत. इतकेंच नव्हे तर जोपर्यंत स्पर्शास्पर्शाचें बंड हिंदुसमाजात आहे तोपर्यंत या दोन वर्गाचे हितसंबंध परस्पर विरुद्धच आहेत असें म्हणावयास हरकत नाहीं. मिश्रमतदारसंघांतफं अस्पृश्यांचे प्रतिनिधी निवडून येण्याची व्यवस्था झाल्यास अल्पसंख्यांक अस्पृश्यांच्या हिताकडे दुर्लक्ष्य झाल्याशिवाय राहणार नाही. जे अस्पृश्य प्रतिनिधि म्हणून निवडून येण्यास उमेदवार या नात्यानें उभे राहतील त्यांना इतर वर्गातील लोकांच्या तंत्राने वागावें लागेल आणि अर्थातच हिंदुसभावाल्यांचे बगलबच्चे होण्यास जे अस्पृश्यवर्गोय उमेदवार तयार होतील तेच निवडून येऊं शकतील. तसें झालें म्हणजे अस्पृश्यांची स्वतंत्र स्वाभिमानी चळवळ ठार बुडेल आणि अस्पृश्य वर्गाला स्पृश्य वर्गाच्या ताटाखालचीं मांजरें म्हणूनच राहावें लागेल. हिंदुसभावाल्यांचा