हिंदु महासभा व अस्पृश्यता - Page 123

हिंदु महासभा व अस्पृश्यता ८१

हा अंतःस्थ डाव आहे. त्यांच्या या कुटिल नीतीमुळेच आम्हीं आमच्या अस्पृश्यबंधूंना त्यांच्या चळवळीपासून दूर राहण्यास सांगत असतों. असो. हिंदुमहासभेची चळवळ ही कृत्रिम, आकुंचित दृष्टीची, ध्येयशून्य व तत्त्वपराडःमुख आहे. अस्पृश्यांविषयी खरी कळकळ त्या चळवळीच्या पुढाऱ्यांत नाही अस्पृश्यांनीं धर्मातर करूं नये व त्यामुळे हिंदूंचे संख्याबळ कमी होऊ नये एवढ्याच उद्देशानें हिंदुमहासभावाल्यांनी अस्पृश्यतानिवरणाचा प्रश्‍न हातीं घेतलेला आहे. अर्थात्‌ त्यात जीवंत कळकळ नाहीं. जेव्हां केवळ न्यायाच्या व समतेच्या दृष्टीनेच विचार करण्यास आणि मानवी इककांवेषयीं तळमळ बाळगण्यास हिंदुसभावाले [शकतील तेव्हाच त्यांच्या चळवळींत खरा जीवंतपणा येईल. आज हिं. म. सभावाल्याना

चातुवण्यांची चौकट मोडून टाका

म्हणून सांगितल तर तँ रुचत नाहीं व तें त्याच्या बुद्धीलाही पटत नाही. हिंदुसमाजाचौ प्रगति खुंटविणारी, त्यांचीं शकलें पाडणारी, त्याला हतबल करून टाकणारी जातिभेदपद्धति कायम ठेवून खरें हिंदुसंघटण होणें शक्य नाहीं. अर्थातच जातिभेदजन्य उच्चनीचपणा कायम ठेवून जे संघटण होत आहे तें केवळ संघटणाचें सोंग आहे.

eee पाण reese पापा = 5 =

अग्रलेख : बहिष्कृत भारत, ता. १२ UMA १९२९.