धर्मेक्य परिषद - Page 124

२८
_धैर्मेक्यपरिषद्‌

मुंबई प्रार्थनासंमाजाच्या ६२ व्या वर्षाच्या वर्धापनदिनानिमित्त एक समारंभ झाला. त्याच्या कार्यक्रमांत वेगवेगळ्या धर्मांच्या लोकांमंध्ये सलोखा बाढविणारी' परिषद्‌ (inter-communal Amity Conference) ही एक बाब होती. परिषंदेमंध्यें निरनिराळ्या धर्माच्या गृहस्थांचीं भाषणें होऊन परिषदेच्यां हेतूला अनुसरून ठराव पसार झाले त्यांत अस्पृश्यता निषेधाचाहि एक ठरावं होला. . परिषदेमध्ये झालेल्या भाषणांत ' बाँबे क्रॉनिकल '.:चे. संपादक मि. ब्रेलवी. यांचे भाषण विशेष मुद्देसुद होतें. अध्यक्ष मि. नटराजन्‌ यांनीं आपल्या भाषणांत धर्मामुळे भांडणें होत नाहींत तर धर्मविषयंक खोट्या समजुतीमुळे भांडणें होतात असें सांगितलें. तें अंशत खरें असलें तरी प्रत्येक धर्मामध्ये (religion) कांहीं ना कांहीं विशिष्ट मतवाद (dogma) असतोचं आणि धर्मापासून Adare सर्वथैव अलग करतां येत नाहीं ही गोष्ट दृष्टीआड करून कसें चालेल? तसेंच, मि. नटराजन्‌ यांनीं हिंदुमुसलमानांमधील सध्याच्या वितुष्टाची उघड्या डोळ्यांनी चर्चा केली नाहीं आणि केवळ आशावादावरच सगळा भर दिला. आशावाद इष्ट याविषयीं शंका नाहीं. . परंतु कार्यकारणमीमांसा योग्य रीतीनेंच झाली पाहिजे. चिकित्सा यशस्वी झाली पाहिजे तर रोगाचें निदान बिनचूक झालें पाहिजे. चिकित्सा चालू ठेवावयास आशावाद उपयोगीं पडेल, परंतु निदानांतील चुकीची भरपाई आशावादानें होऊ शकणार नाहीं, हें विसरतां कामा नये. असो, अशा प्रकारच्या परिषदांमध्ये सुशिक्षित लोक भाग घेतात, परंतु दंगे- करणारे लोक अशिक्षित असतात. आणि जे दुसरे शिक्षित लोकं स्वार्थाला वश होऊन जाती-जातींत वैमनस्य वाढवितात तेही अशा परिषदांमध्ये भाग घेत नाहींत. सध्यांचीं हिंदुमुसलमानांमघलीं भांडणें मौलवी, शास्त्री, भिक्षुक आणि आपआपल्या समाजांत पुढारीपणा मिळवावयास हपापलेले लोक व थोडेसे माथेफिरू यांच्यामुळे माजलीं आहेत, ही गोष्ट नाकबूल करून, केवळ एकमेकांच्या धर्माच्या अनाभ्यासामुळें वेगवेगळ्या धर्मानुयायांमध्यें सलोखा, ऐक्य व प्रेम हीं नांदतील असें मानणें ही आमच्या मतें केवळ आत्मवंचना होय

प्रासंगिक विचार : बहिप्कृत भारत, ता. १२ एप्रिल १९२९.