२९
.. खासः देवालय
अस्पृश्यांकरिताः
नावांच्या एका. धनिक' हिंदु. गृहस्थांनी रत्नागिरी येथें तेथील रा. कीर.
खास-देवालय ब्रांधण्याचें ठरविलें अस्पृश्यांकरितां पतितपावन मंदिर नांवांचे एक
कुर्तकोटी यांच्या असून त्या देवळाची कोनशीला बसविण्याचा समारंभ डॉ.
अध्यक्षतेखाली झाला. डॉ. . कुर्तकोटी यांचीं धार्मिक व. सामाजिक. मतें रबरासारखीं लवचीक आहेत. आणि. अस्पृश्यता निवारणाच्या बाबतीत. आतांपर्यंत अनेक वेळां त्यांनीं धरसोडीचीं मतें प्रदर्शित . केलीं आहेत हें, प्रसिद्धच
आहे. आम्हांला फक्त रा. PR यांच्या गैरसमजुतीबद्दल वाईट वाटतें; त्यांनी
आपला पैसा अशा प्रकारें खर्च :करण्याऐवजीं. अस्पृश्य वर्गातील., लोकांच्या शिक्षणासाठी व अस्पृश्यता निवारणाच्या चळवळींमध्ये खर्च केला असताः तर तो, सत्कारणीं लागला असता. बहिष्कृत वर्गासाठी ख़ास देवळांची जरूरी आहे असें आम्हांस वाटत नाहीं, इतकेंच नव्हे तर अशी खास देवळें. बांधल्यानें अस्पृश्यतेचा,
प्रश्न सुटणें अधिक लांबणीवर पडेल अशी आमची पक्की समजूत आहे. . ' अस्पृश्यांची, मागणी मुख्यत: अस्पृश्यता निवारणासंबंधाची आहे, अर्थात् सध्यां अस्तित्वांत असलेल्या इतर हिंदुसमाजाच्या भजणुकीच्या देवळांत त्यांना प्रवेश हवा आहे. . देवळें नाहींत म्हणून देवाची भक्ति करतां येत नाहीं असें नाहीं. घरीं बसूनहि देवाची पूजा करतां येते, देवाचें स्मरण करतां येतें, त्याला देऊळच पाहिजे
असें नाहीं. मात्र अस्पृश्यांकरितां खास देवळे बांधल्याने स्पृश्य व अस्पृश्य
यांच्यामधील भेदरेषा कायम होणार आहे. रत्नागिरीचें नवीन देऊळ महार-चांभारांचे
देऊळ म्हणून मानलें जाईल व सोवळ्या लोकांना आपलीं देवळें विटाळापासून
सुरक्षित राहिल्याबद्दल समाधान वाटण्याला मात्र कारण होईल, याविषयीं आमची
खात्री आहे. रा. कीर यांनीं नकळत व सद्धेतूनें कां होईना, परंतु
कुर्तकोटींसारख्यांच्या नादीं लागून अस्पूर्यता निर्मूलनाच्या कार्याची स्वतःचे
पेसे खर्चून मोठी हानि केली असेंच आमचें मत आहे आणि रा. कीर यांनीं देऊ
केलेली ही खास देवळाची देणगी रत्नागिरी येथील आमच्या बहिष्कृत वर्गीय बंधूंनी
आतांच साभार नाकारावी अशी त्यांना आमची सूचना आहे. i
प्रासंगिक विचार : बहिष्कृत भारत, ता. १२ एप्रिल १९२९.