बीचमें मेरा चांदभाई ! - Page 127

२३१
बीचमें मेरा चांदभाई !

वन्हाडांतील सुमारें पांच हजार, महारांनी, आपली अस्पृश्यता हिंदुसमाजानें अमुक मुदतीपर्यंत काढून टाकली नाहीं तर आपण धर्मातर करणार असें प्रसिद्ध केल्याचे आमच्या वाचकांना ठाऊकच आहे. सदरील मंडळीचे हस्तपत्रक व त्यावरील आमचे विचार आम्हीं यापूर्वीच प्रसिद्ध केले आहेत.+ त्या बाबतींत रा. जयराम नाना वैद्य यांनीं बडोद्याच्या 'जागृति' पन्नांत दोन लेख आतांपर्यंत प्रसिद्ध केले आहेत. पहिला लेख आमच्या वाचण्यांत आला तेव्हां आम्हीं जाणूनबुजून तिकडे दुर्लक्ष केलें, परंतु पुनः तेंच तुणतुणे वाजविण्याचें वैद्यांनी चालू . ठेवल्याकारणानें त्या बाबतींत दोन we लिहिणें इष्ट वाटतें. वैद्यांनी वरील धमकी पोकळ आहे असे म्हटलें आहे. या आव्हानाचा स्वीकार करणें किंवा न करणें हें ज्यांनीं ती धमकी दिली आहे त्यांचें काम आहे. परंतु वैद्यांनी आपल्या लेखांत मरीआई, जखीण वगैरे देवतांची उपासना वगैरे अप्रस्तुत गोष्टींचा उल्लेख करून, जर अस्पृश्यांना आपली अस्पृश्यता नाहींशी करावयाची असेल तर त्यांनीं प्रार्थनासमाजाचे अनुयायी व्हावें, असा उपदेश केला आहे. प्रार्थनासमाजाच्या मतांचा प्रश्‍न येथें अप्रस्तुत आहे आणि त्या समाजानें अस्पृश्यता निवारणासाठीं केलेले प्रयत्नहि आम्ही नाकबूल करूं इच्छीत नाहीं. परंतु मुख्य प्रश्‍न आहे तो हा कीं, अस्पृश्य वर्गाला आत्मसात्‌ करण्याचें सामर्थ्य प्रार्थनासमाजामध्यें आहे किंवा काय ? तसें सामर्थ्य नसेल तर अस्पृश्यता निर्मूलनाचा उद्देश पार पडूं

शकत नाहीं हें स्पष्ट होय. जे अस्पृश्य धर्मांतर करूं इच्छितात तें मोक्षप्राप्तीसाठी

नव्हे तर अस्पृश्यतेचा डाग घालविण्यासाठींच. प्रार्थनासमाजाचें सख्याबल अल्प आहे, हिंदुसमाजाशीं टक्कर देण्याचें त्याच्यांत सामर्थ्य नाहीं, खेडोखेडीं त्याचे अनुयायी नाहींत, इतकेच नव्हे तर प्राथनासमाजाचे सभासद हे साधारणत: हिंदुच म्हणून समजले जातात. फार काय, जातिभेदाची बंधने तोडणारे लोक त्यामध्ये हातांच्या बोटांवर मोजण्याइतके तरी सापडतील किंवा नाहीं याची शंका आहे. अशा स्थितींत अस्पृश्य प्रार्थनासमाजिष्ट झालें तरी त्यांची अस्पृश्यता कशी नाहींशी व्हावी ? रा. वैद्य हे समतावादी व बहिष्कृत वर्गाविषयी सहानुभूति बाळगिणारे गृहस्थ आहेत. हें आम्हांला माहीत आहे. परंतु प्रस्तुत वादांत 'गप्प बसावयाला काय घ्याल ? ' असें त्यांना विचारण्याची पाळी आमच्यावर आली आहे. |

७ ® ७

1पाहा, अग्नलेख क्रमांक २१ आणि त्या संबंधी परिशिष्ट, .

प्रासंगिक विचार : बहिष्कृत भारत, ता, १२ एप्रिल १९२९.