देव पुजाऱ्यांचा कीं भक्तांचा ? . . - Page 128

32
देव पुजायांचा कीं भक्तांचा ?

मद्रास इलाख्यांतीलं wis देवस्थान कमिटीने आपल्या ताब्यांतल्या पांच तालुक्यांमधील देवालंयें अस्पृश्यांसुद्धां सर्व हिंदुंना मुक्तद्वार करण्याचा ठराव केला आहे, परंतु जीर्णमतवाद्यांना अर्थातच हा ठराव नापसंतं असून ते त्याविरूद्ध खटपट करीत आहेत. त्या ठरावाला विरोध होणार ही अटकळ होतीच. या ठरावाची बातमी समजली तेव्हां एरोड येथील 'ईश्वरा' च्या देवळांत जाण्यासाठी बहिष्कृत वर्गातले कांही लोक तारीख ४ एप्रिल १९२९ रोजी जमावाने निघाले. त्याची गुणगुण कळल्य़ाबरोबर देवळाच्या पुजाऱ्यांनी देवळाच्या गाभाऱ्याच्या दरवाज्याला वाज्याला कुलुपे. लावलीं आणि बहिष्कृतांना देवदर्शन'होऊ नये अशी व्यवस्था केली | तेव्हां -बहिष्कृत वर्गातली मंडळी मुखशाळेंत बसून राहिली आणि नारळ वगैरे नैवेद्याच्या “वस्तु तेथेंच देवाला अर्पण करून घंटा वाजवूं लागली पुजाच्यानी, कमिडीनें सदरील 'ठराव रद्द केला. नाहींतर आपण राजीनामे देऊ अशी धमकी दिली आहे. आणि जीर्णमतवादी लोकांनीं या ठरॉवाविरूद्ध चळवळ चालवूनं मारामाऱ्या करण्याचीहि 'तंयोरी केली आहे अशी बातमी आहे. ` WS देवस्थान कमिटी आपल्या ठरावाला चिकटून ' राहण्याचे ` धैर्य कितपत दाखविते तें आतां पहावयाचे आहे. देव

'पुंजान्यांचा, नुसत्या वरिष्ठ वर्गाचां किंवा अस्पृश्यांसुद्धां सर्व हिंदूंचा, हा प्रश्‍न जितक्या लवकर धसाला लागेल तितके चांगलें |

प्रासंगिक विचार : बहिष्कृत भारत; ता. 92 एप्रिल १९२९,