३३ 7
खोती ऊर्फ शेतकरी वर्गाची गुलामगिरी
भारतीय बहिष्कृत समाज सेवक .संघाच्या विद्यमानें रत्नागिरी जिल्ह्यांतील खेड व चिपळूण या तालुक्यातर्फ रत्नागिरी जिल्हा बहिष्कृत परिषदेचें दुसरें अधिवेशन गेल्या ता. १३ मिनहू "रोजी चिपळूण मुक्कामी भरलें होतें. त्या संबंधीचा फायदा घेऊन शेतकरी वर्गाची एक परिषद तेथेंच दुसऱ्या दिवशीं भरविण्यांत आली. अर्थातच या शेतकरी परिषदेला कुणबी, मराठे व महार या जातीच्या लोकांचा भरणा होता. आधीं सर्व हिंदुस्थानांत शेतकरी वर्गाची स्थिति अत्यंत हलाखीची आहे आणि त्यांतहि रत्नागिरी जिल्ह्यांत शेतकऱ्यांचा विशिष्ट परिस्थितिमुळे विशेषतः धारेबंदीच्या तेथल्या खास पद्धतीमुळे आज कैक पिढ्या भयंकर कोंडमारा -झालेला आहे. “कोंकणांत रत्नागिरी व कुलाबा या जिल्ह्यांमध्ये खोती पद्धति प्रचलित आहे. मुंबई इलाख्यांतील दुसऱ्या कोठेंही ही पद्धति अस्तित्वांत नाहीं. रत्नागिरी व कुलाबा येथील खोती पद्धतीत कांही फरक आहे. कुलाब्यापेक्षां रत्नागिरी जिल्ह्यांत शेतकऱ्यांना विशेष जाच व जुलूम सोसावा. लागतो आणि खोतांचे प्राबल्य फारच. आहे. रत्नागिरी जिल्ह्यांतील मालवण व वेंगुर्ले हे दोन तालुके खेरीज करून बाकी सर्व.तालुक्यांत कमीजास्त
प्रमाणाने खोतीचें बंड आहे. रत्नागिरी जिल्ह्याच्या ज्या भागांत खोताँचे विशेष प्रस्थ आहे त्या भागांतील व ज्या भागांत खोतांची पद्धति नाहीं किंवा असली तरी अल्प प्रमाणांत आहे त्या भागांतील व ज्या भागांतील शेतकरी वर्गाच्या स्थितींत ठळक फरक असल्याचें दिसून येतें. - खोतीपद्धतीखालील शेतकऱ्यांची सांपत्तिक स्थिति वाईट असतेच, परंतु इतर बाबतीतही त्यांची अवनति झाल्याचें दिसून येतें. ' विशेषतः स्वाभिमान, तडफ, हिंमत हे :
मनुष्याच्या उन्नतीस अवश्य असलेले गुण
खोतीसारख्या' गुलामगिरीमध्यें पिळून निघाल्यामुळें नष्ट होतात. खोतीच्या जाचाची कल्पना माहितगाराखेरीज इतरांना होणें शक्य नाहीं. . खोत म्हणजे गावांतला एक लहामसा सुलतान असतो. जेव्हां गांवची खोती वेगवेगळ्या
* ता.१३ एप्रिल १९२९. |
मिनहू = वर सांगितलेल्या महिन्याचा, त्याच महिन्याचा, चालू महिन्याचा-महाराष्ट्र शब्दकोश, विभाग सहावा, संपादक-य. रा. दाते, पुणे, १९३८, पृष्ठ २४८६.