८८ . डॉ. बाबासाहेब आंबेडकर लेखन आणि भाषणे
लोकांमध्यें व त्यांच्या अनेक घराण्यांमध्यें हिस्सेरसीनें विभागली असते तेव्हां अनेक सुलतानांचा जुलूम गांवांतल्या शेतकऱ्यांना सोसावा लागतो. शेतकऱ्याला सरकारदेणें देऊन शिवाय खोतीहक्काबद्दल वेगळें देणें द्यावें लागतें. रयतवारी पद्धतीमध्ये फक्त सरकार देणेंच द्यावयाचें असतें. खोतीमध्ये अशा रीतीनें शेतकऱ्यावर कराचा बोजा अधिक पडतोच, परंतु त्याखेरीज नानाप्रकारांनीं कुळांकडून खोत पैसे उकळीत असतात. कुळानें पैसे भरले म्हणजे रीतसर पावती द्यावयाची नाहीं असा खोतांचा बाणा असल्यामुळे
कुळाची शेंडी नेहमी खोताच्या हातांत
wed, वाटेल तशी बाकी कुळावर काढून खोत लोक त्यांना नेहमी सतावीत असतात. खोत ब्राह्मण असला तर कुळाच्या परसांतल्या झाडावर फणस राहावयाचा नाहीं आणि भाजी लावूनहि त्याला व त्याच्या घरांतल्या माणसांना ती खावयाला मिळावयाची नाहीं. भोपळ्याल्या वेलीवर भोपळा टिकावयाचा नाहीं. खोत मराठा किंवा मुसलमान असला तर तो कोंबडी शिल्लक ठेवावयाचा नाहीं. म्हणजे कुळाला स्वामित्व असें काठेँच नाहीं ! जें कांहीं त्याच्या घरांत असेल तें खताच्या मालकीचे | एकादा शेतकरी खोताच्या जुलूमाचा प्रतिकार करण्यास पुढें सरसावला तर त्याला वठणीस आणण्याची अनेक साधनें खोतापाशीं असतात. एक तर गांवचा खोत हाच बहुतकरून गांवचा पोलीस पाटील असतो. त्यामुळे दमदाटी करण्याचा किंवा खोटा आळ घालून शेतकऱ्याला छळण्याचा मार्ग त्याला मोकळा असतो. दुसरा एक उपाय म्हणजे शेतकऱ्याचो गुरें चरणौस गेली असता कोडवाड्यात घालणें हा होय. गांवांतली चराईची जमीन खरोखर सबंध गांवाच्या मालकीची असतां तिच्यावर खोत आपला मालकी हकक गाजवीत असतो आणि गुरांवाचून शेती शक्य नसल्यामुळें शेतकऱ्याला आपल्या ऐपतीप्रमाणें व जरूरीप्रमाणे गुरें बाळगावींच लागतात व शेतकऱ्याच्या खास मालकीची चराईची जमीन नसल्यामुळें गांवचराईत तीं धाडावीं लागतात. अर्थात् शेतकरी स्वाभाविकपणेच खोताच्या कचाटींत सांपडतो. खोताच्या जुलुमाचा दुसरा सर्वांत वाईट प्रकार म्हणजे वेठीच्या कामाची पद्धती होय. कायद्यानें वेठीला मनाई केली आहे, पंरतु खोत हा गांवांतला 'कर्तुमकर्तुम' सामर्थ्यवान असल्यामुळे कायद्यांतली मनाई असून नसून सारखीच होते. खोताच्या 'खाजगी' म्हणून कांहीं जमिनी असतात, या जमिनीमधील लागवडीचीं सर्व कामें खोत लोक ah करून घेतात. या कामाबद्दल शेतकऱ्याला व त्याच्या बायकामुलांना धड पोटापुरतीहि मजुरी मिळत नाहीं. खोत हाच गावांतला सावकार असतो व त्या रूपानेंहि तो शेतकऱ्यांना