खोती ऊर्फ शेतकरी वर्गाची गुलामगिरी भे ८९
वाटेल तसा पिळून काढतो. शेतकऱ्यांच्या मुलांना शिक्षण मिळूं नये यांसाठी खोत हरप्रयत्न करीत असतात. कारण शेतकरी लिहावयास व वाचावयास शिकले तर आपली सुलतानी अशीच चालूं देणार नाहींत याची त्यांना खात्री असते. त्याखेरीज शेतकऱ्यांवर खोतांचा सामाजिक जुलूम असतो तो तर विचारूंच नये. कुणबी मुंबईला येऊन दोन पैसे मिळवून गांवी गेला अणि त्याला धोतर, कोट, रुमाल वापरण्याचे सामर्थ्य असेल तरी गांवात गेल्यावर
धोतर सोडून लंगोटी नेसणें भाग पडतें
त्यानें ठरलेल्याच हीन दर्जाचा पोषाख केला पाहिजे, नाहींपेक्षां त्यानें आपली मर्यादा ओलांडली असें खोत समजात ! कुणब्याच्या बायकांवर सुद्धां विशिष्ट पद्धतीनें लुगडे नेसण्याची सक्ती असते | अशा प्रकारें अस्पृश्य मानलेल्या जाती किंवा गुजराथमधील 'काळीपरज' किवा 'राणीपरज' नांवाची जात यांच्यावर जसा सामाजिक जुलूम होतो, तसा खोतीपद्धतीखालील कुणबी जातीच्या लोकांवरहि जुलूम होतो आणि त्या दृष्टीनें या सर्व जाती समदुःखी आहेत असें म्हणावयास हरकत नाहीं. माणुसकीला लांच्छनास्पद अशी ही गुलामगिरी या विसाव्या शतकांत चालू असावी ही खरोखरच हिंदी समाजाला मोठ्या शरमेची गोष्ट आहे. सध्यां शेतकरी कामकरी पक्षाची चळवळ म्हणून वर्तमानपत्रांतून व सभांतल्या भाषणांतून ऐकूं येतें. या चळवळीची हल्लीं एक 'फॅशन'च निघाली आहे. परंतु या खोतीकडे अद्यापि कोणी लक्ष देत नाहीं, इतकेच नव्हे तर शेतकरी कामकरी चळवळीचे गोडवे जीं वर्तमानपत्रे गातात, त्यांतली बहुतेक पत्रे खोतीचे समर्थन करितात आणि शेतकऱ्यांच्या खोतीविरूद्ध असलेल्या तक्रारी केव्हांहि प्रसिद्ध करीत नाहींत | सरकारला शिव्या देण्यापुरतीच त्यांना शेतकरी कामकरी चळवळ पाहिजे असते. शेतकऱ्यांना सध्यांच्या परिस्थितींत न्याय मिळणें कठीण आहे. एक तर वर म्हटल्याप्रमाणे. बहुतेक गांवांत खोत हाच गांव फौजदार असतो. खोतांच्या जातमाईचा तालुक्याच्या व जिल्ह्याच्या अधिकाऱ्यांत भरणा असतो, फार काय परंतु शेतकऱ्याला न्याय मिळविण्यासाठी खोतावर दिवाणी फौजदारी काम चालवायाचें असल्यास त्याचें वकीलपत्र घेण्यास कोणी सहसा तयार होत नाहीं ! थोडक्यांत सांगावयाचें म्हणजे चोहीकडून तेथील खोतीच्या पाशांत गुरफटून गेलेले आहेत. अशी ही खोती मूळची आहे तरी काय व खोतांचे वाजवी हक्क आहेत तरी काय, याचा विचार केला असतां आणि खोतीचा आजपर्यंतचा. इतिहास चिकित्सक दृष्टीनें पाहिला असतां आपल्यांस असें दिसून
येतें कीं,