खोती उर्फ शेतकरी वर्गाची गुलामगिरी - Page 132

९० डॉ. बाबासाहेब आंबेडकर लेखन आणि भाषणे

खोतांनीं हळुहळू पाय पसरून शेतकऱ्यांचे हक्क बळकावले

आहेत आणि त्यांना निर्माल्यवत्‌ केलें आहे. देशावरचा जसा पाटील तसां कोंकणांतला खोत. शब्दशः 'खोत' म्हणजे मक्तेदार असा अर्थ आहे. कित्येक गांवें शेतकरी आणून वसविण्याच्या कामीं खोतांनीं मदत केल्यामुळें त्यांना गांवकीचें वगैरे कांही विशेष हक्क देण्यांत आले. खोतानें ठरलेली रक्‍कम शेतकऱ्यांकडून जमीन सारा म्हणून वसूल करावयाची आणि त्यांतली ठरलेली रक्कम सरकारांत भरावयाची. बाकीची रक्कम खटपटीबद्दल त्यानें स्वतःला घ्यावयाची. तो जमिनीचा मालक नव्हे. जमिनीचे मालक शेतकरीच. खोत जमिनीचा मालक नव्हें असें म्हणण्यास अनेक सबळ पुरावे आहेत. खोंतांच्या सनदामध्ये ते गांवांचे मालक असल्याबद्दल कोठेंच आधार सांपडत नाहीं. उलट, खोतांना सरकारसाऱ्याच्या वसुलीबद्दल देशावरील पाटलांप्रमाणें मुशाहिरा मिळत असे, असें स्पष्ट पुरावें सांपडता खोत हेच जर त्यांच्या गांवांतल्या जमिनींचे मालंक असते तर त्यांना मुशाहिरा देण्याचें कारण काय ? मुशाहिरा मालंकांना देत नसतात, नोकरांनाच देतात. सनदी हक्काच्या दृष्टीनें खोत हे देशावरील पाटलांप्रमाणेंच असतांहि त्यांच्यांत लेखणीवाले ब्राह्मण वाढल्यामुळें त्यांनी हळुहळू हातपाय पसरून शेतकऱ्यांच्या हक्कांचे आक्रमण केलें आणि पूर्वी कायद्यानें नसलेले हक्क वहिवाटीच्या द्वारें बळकाविले. खोती हक्क वंश परंपरागत असले तरी त्यांची गहाण विक्री करतां येते. त्यामुळें मराठे वगैरें ब्राह्मणेतर खोतांची संख्या कमी होऊन ब्राह्मण, कायस्थ वगैरे लेखणीवाल्या लोकांची खोतवर्गात संख्या वाढली आणि त्याकारणानें देशावरील पाटलांना जें साध्य झालें नाहीं तें खोतॉना साध्य झालें. खोतीपद्धतींत रयतेचे अनेक प्रकार आहेत, आणि कमी जास्त प्रमाणाने त्यांचा दर्जा आहे. त्याविषयी माहिती देण्याचें हे स्थळ नव्हें. खोतीमध्यें धारेकरी वर्गातल्या लोकांना -तेवढासा त्रासं पोहचत नाहीं. किंबहुना धारेकरी हे आपल्या कुळांवर थोड्या कमी प्रमाणांत कां होईना सत्ता गाजवित असतात. खोतांची 'खाजगी' म्हणून जमीन असते, ही त्यांच्या मालकीची. परंतु ही खाजगी जमीन, संस्थानिक जसें आपली खाजगी संपत्ति संस्थानच्या कारभारांतूनच पैदा करितात, तशी खोतांनीं आपल्या खोतपणाचा फायदा घेऊन बहुधा संपादलेली आहे. या खाजगी जमिनींतले शेतकरी म्हणजे शुद्ध उपरी कुळें. त्यांच्याकडून जमीनवहिवाटीची एकसाली कबुलायत घेण्यांत येते. खोतांनी अनेक लपंडाव लढवून आतांपर्यंत |