खोती उर्फ शेतकरी वर्गाची गुलामगिरी - Page 133

खोती ऊर्फ शेतकरी वर्गाची गुलामगिरी ९१

हजारों हक्कदार शेतकऱ्यांना उपरी कुळें बनविलें

असून अद्यापि तो क्रम चालूच आहे. शेतकरी अशिक्षित, अज्ञान व पैशाच्या दृष्टीनें लाचार असल्यामुळें खोतांचे चांगलें फावले आणि त्यांमुळे शेतकरी आपले हक्क गमावून बसले. हक्कदार शेतकऱ्यांकडून जबरदस्तीनें व अप्रत्यक्षरीत्या छळ"करून एकसालीं कबुलायती घेण्याचा सपाटा सध्यां खोतांनी लावल्यामुळे शेतकऱ्यांमध्ये

भयंकर असंतोष

माजलेला आहे. आज ना उद्यां आपल्या सुलतानीचे बारा वाजणार हें बहुतेक खोतांना कळून चुकलें आहे. म्हणून ' खाजगी ' जमीन वाढविण्यासाठी व हक्कदार. शेतकऱ्यांना उपरी कुळें बनविण्यासाठी त्यांचें प्रयत्न जोरानें चालू आहेत. हे प्रयत्न म्हणजे अर्थातच शेतकऱ्यांची निरनिराळ्या मार्गानी जळणूक करणें हे होय. त्यामुळें खोतीचा प्रश्‍न सध्या निकराला आलेला आहे. खोती प्रदेशांतील शेतकऱ्यांना माणुसकीचें हक्क पुनः मिळवून दिले पाहिजे तर

_ खोती पद्धती. समूळ नष्टच केली पाहिजे.

सध्या खोतीसंबंधाचों कायदा आहे. तो अत्यंत अपुरा आहेचं, परंतु जो कायदा आहें त्याची अंमलबजावणी योग्य रीतीनें होऊ शकत नाहीं. आणि जोपर्यंत खोती नष्ट झाली नांहीं निदान तिचीं नखें काढून टाकण्यांत आली नाहींत व तिचें दांत पाडण्यांत आले नाहींत, तोंपर्यंत त्या कायद्याची अमलबजावणी योग्यरीतीने होणे केव्हांही शक्य नाही. सदरील कायद्यांत तात्पुरती दुरुस्ती करूनही कांहीं उपयोग व्हावयाचा नाहीं. याकरितां डॉ. आंबेडकर यांनीं कायदेकौन्सिलमध्यें खोतीसंबंधाचे एक झणझणीत बिल आणण्याचें ठरविले आहे व तसें त्यांनीं चिपळुणच्या शेतकरी परिषदेमध्ये + जाहीरही केलें.

T पहा. खंड १८, भाग-१, पू. १६२-१६५.

अग्रलेख : बहिष्कृत भारत, ता. ३ मे १९२९.