पुनः सर्व गिरण्यांचा संप | - Page 134

३४
पुनः सर्व गिरण्यांचा संप

गेल्या वर्षी मुंबईतील गिरण्यांचा सार्वत्रिक संप होऊन तो सहा महिने चालला. तो कसाबसा मिटला आणि गिरण्या पुनः चालू झाल्या तरी कोणत्या ना कोणत्या निमित्ताने निरनिरळ्या गिरण्यांमध्यें व गिरण्यांच्या गटांमध्यें संप होतच होते. गेल्या मोठ्या संपाच्या तडजोडीच्या वेळीं सरकारनें वादाच्या चौकशीसाठीं नेमलेल्या फॉसेट कमिटीचा रिपोर्ट प्रसिद्ध होऊन, गिरण्यांचे मालक व कामगार यांच्यामध्यें वेळोवेळीं उद्‌भवणाऱ्या वादांचा निकाल लावण्याची कांहीं तरी कायमची व्यवस्था होईल अशी आशा वाटत होती, इतक्यांत दुसऱ्या मोठ्या संपाची कल्पना निघाली. वाडियाबंधूंच्या मोरबाग (R), टाकसाळ (टेक्सटाइल) व सेंच्युरी या तीन गिरण्यांतले सुमारें अठरा लोक मालकांनीं कामावर ठेवण्याचे नाकारल्या- बहल त्या गिरण्यांतल्या पंधरा सोळा हजार लोकांचा संप करविण्यांत आला आणि गिरणीकामगार यूनियन व मालक यांच्या दरम्यान तडजोड होऊन हा संप मिटला नाहीं तेव्हां मालकांनी पुनः कामावर येतील तीं जुनीं व बाकीचीं नवीं माणसें भरून आपल्या गिरण्या पुनः चालू केल्या. त्यानंतरही मालक व यूनियन यांच्या दरम्यान वाटाघाट झाली, परंतु त्यांत कांहीं तडजोडीचा मार्ग निघाला नाहीं. तेव्हा यूनियननें मुंबईतील सर्व गिरण्यांचा संप ता. २६ एप्रिलपासून पुकारला. पंधरा हजार लोकांचा संप यूनियनला यशस्वी करतां आला नाहीं, म्हणून दीड लाख लोकांचा संप करून आपली ag बचावण्याचा युनियनच्या पुढाऱ्यांनी प्रयत्न चालविला आहे. तक्रारीचें पहिलें कारण मोरबाग गिरणींत एका माणसाला तो सुमारें पंधरा दिवस गैरहजर राहुन पुन: कामावर आला तेव्हां त्याला परत कामावर ठेवण्यांत आलें नाहीं त्यामुळें घडलें. त्यानंतर टाकसाळ व सेंच्युरी या गिरण्यांतले कांहीं लोक काढून टाकण्यात आलें. सेंच्युरी मिलमध्ये यूनियनच्या एका स्थानिक पुढाऱ्यानें फ्रेमीचे सांचे साफ करण्याकरितां नेहमीपेक्षा एक तास अगोदर सर्व खातें, गिरणीच्या अधिकाऱ्यांना न विचारतां स्वतःच्या हुकुमाने बंद केलें ; म्हणून त्याला काढून टाकण्यांत आलें व त्याच्याकरितां संपाची चळवळ केली म्हणून दुसऱ्या कांहीं लोकांना काढून टाकण्यांत आलें. टाकसाळींत रजेशिवाय गैरहजर राहिल्याबहदल दोन चार इसमांना खात्याच्या अधिकाऱ्यांनी बंद केले. मोरबागच्या ज्या एका माणसाला कामावर घेतलें नाहीं तो रजा