३६
चिपळूण-येथील सहभोजन .
चिपळूणच्या परिषदेच्या वेळी 1तेथील रा. बर्वे* वकील यांच्या घरी पूर्वास्पृश्यांसुद्धां सर्व . जातीचें सहभोजन .झाले. त्याची हकीकत दुसरीकडे दिलीच आहेः मुंबईंपुण्यासारख्या शहरांमध्ये अशीं सहभोजने झालीं तर त्यांचे तेवढेंसें कौतुक. न केलें तरी चालेल. परंतु -परशुरामक्षेत्र म्हणून नांवाजलेल्या चिषळूणसारख्या एका लहानशा शहरात-कोंकणस्थ ब्राह्मणांच्या बाले किल्ल्यांत आणि. खुद्द एका कोकणस्थ ब्राह्मणाच्या घरीं त्याच्या .आमंत्रणावरून असा संस्मरणीय -सहभोजन समारंभ व्हावा, हें बदलत्या काळाचे लक्षण नव्हे असें कोण म्हणेल ? रा. बर्वे वकील यांनी चिपळुणसारख्या ठिकांणी समतावादाचें ध्वजारोपण
करण्यांचें जें धैर्य दाखविलें. त्याबद्दल . त्यांना आम्ही मनःपूर्वक धन्यवाद देतों. . जातीभेद व अस्पृश्यता यांच्या बाबतींतील लोकांचे पूर्वग्रह इतके खोल गेलेले आहेत .की,. त्यांचे उन्मूलन व्हावयाला लोकमताला वेळोवेळी जबर धक्के बसणें अवश्य.आहे.. ब्राह्मणादि: जातींच्या पंक्तीला बसून जेवणयांत -मोक्षप्राप्ति आहे किंवा त्यामुळें बहिष्कृत वर्गातल्या लोकांना मोठेपणा किंवा धन्यता वाटली पाहिजे असें मुळींच नाहीं. परंतु समतेच्या आङ येणारे अडथळे दूर होण्यास अशा सहभोजनांचे सहाय्य होतें, हाच त्यांचा विशेष आहे. समतेच्या प्रस्थायनेनें दलितवर्गाचा भौतिक..उद्धार होइल. परंतु वरिष्ठ म्हणविणाऱ्या जातींचा आत्मिक उद्धार होईल. . सांप्रत त्यांचा जातिदुराभिमान त्यांच्या आत्मिक उद्धाराच्या आड येत नाहीं असें कोणी म्हणूं शकेल काय? व त्यासारखे समाजवीर ठिकठिकाणीं निघतील तर अस्पृश्यता हां हां म्हणतां हद्दपार होईल आणि ब्राह्मणब्राह्मणेतर वादार्चेहि कारण उरणार नाही.
७७ ७
शनिवार, ता.१३ एप्रिल १९२९ रोजी रत्नागिरी जिल्हा बहिष्कृत परिषद आणि रविवार ता. १४ एप्रिल १९२९ रोजी रत्नागिरी जिल्हा शेतकरी परिषद भरली होती. त्या दोन्ही परिषदा चिपळूण येथे भरल्या होत्या. पाहा वृत्तांत भाषण क्रमांक, क्रमश: २५ आणि २६,
खंड १८ भाग-१.
*विनायकराव बर्वे वकील.
प्रासंगिक विचार : बहिष्कृत भारत, ता. ३ मे १९२९.