३८
'जीर्णमतवांद्यांची बेचवदारी
महाड येथील चवदार तळ्याच्या बाबतींत बहिष्कृत वर्गातील लोकांनीं चालविलेल्या लढ्यांत आपल्याला यश येण्याची आशा नाहीं आणि त्या -तव्न्यावर पाणी भरण्याचा बहिष्कृत वर्गाचा हक्क शाबीत होणार याची खात्री वाटूनच कीं काय तेथील जीर्णमतवादी हिंदूंनीं त्या तळ्यावर बहिष्कार घालण्याचें योजिलें असून आसपासच्या भागांतले सोवळे लोक आपआपल्या आवारांत विहिरी खोदू लागले आहेत अशी बातमी महाडां येथील बातमीदारानें पाठविलेली दुसरीकडे
प्रसिद्ध केली आहे. चवदार तळें खाजगी मालकीचे म्हणून ठरविण्याचे प्रयत्न केल्यावर आतां त्या तव्न्यावरच बहिष्कार घालून सोवळे हिंदू लोकं आपला सोवळेपणा कायम ठेवूं पाहत आहेत, ही पराजयांविषयीं त्यांची कबुलीच समजली पाहिजे. बहिष्कृत वर्गाच्या स्वाधीन सदरील तळें करण्याची त्यांची कल्पना आम्हांस तरी अनिष्ट वाटत नाहीं. धर्मशाळा, देवालयें वगैरेही सार्वजनिक स्थळें त्यांनीं बहिष्कृतांच्या हवालीं केल्यास वाईट नाही. बाकी, चवदार तळ्याजवळील भागांत विहिरी खणल्यास त्यांना त्याच तलावाच्या पाण्याचे झरे लागतील पर्यायाने त्याच तलावाचें पाणी सोवळ्या लोकांच्या पोटांत जाईल. परंतु जीर्णमतवाद्यांचें dad रबराप्रमाणें लवचीक असल्याकारणानें जमिनीच्या फिल्टरमधून आलेलें पाणी सोवळें समजून पिण्यांत त्यांचा धर्म बुडणार नाही ही
त्यांतल्या त्यांत समाधानाची गोष्ट होय ! |
i
लक उमा नरर
tog, परिशिष्ट क्रमांक : ६. | |
प्रासंगिक विचार : बहिष्कृत भारत. ता. ३१ मे १९२९.