३९
गिरणी कामगारांचा संप व ब्राह्मणेतर पत्रे
“मुंबईच्या गिरणी कामगारांच्या सध्यांच्या संपासंबंधानें कित्येक ब्राह्मणेतर पत्रांनी लोकांचा गैरसमज करण्याचा प्रयत्न चालविला आहे. कामगारांनी संप केला कीं त्याविषयीं सहानुभूति दाखविलीच पाहिजे, मग तो संप चुकीचा असो किंवा योग्य कारणास्तव केलेला असो, खुद्द कामगाराचे त्यापासून नुकसान होवो किंवा त्यांचा नफा होवो, अशी या पत्रकारांची समजूत झालेली दिसते. विशेष आश्चर्याची गोष्ट ही कीं, सध्याच्या. संपाला अनुकूल नसल्यामुळें जे कामगार कम्युनिस्टांच्या युनियनच्या व्हॉलंटियर्सना न जुमानता कामावर जात आहेत त्यांच्यावर जातिविषयक स्वार्थाचा आरोप करण्यापर्यंत एका ब्राह्मणेतर पत्रकाराची मजल गेली आहे ! या खेपेच्या गिरण्यांच्या सार्वजनिक संपाला पहिल्यापासून बहिष्कृत . वर्गातील व मुसलमान कामगारांची अनुकूलता नाहीं हें प्रसिद्धच आहे. तथापि मराठे व तत्सम वर्गातलेहि पुष्कळ कामगार सध्याच्या संपाला विरुद्ध असून तेहि कामावर जात आहेत. सुमारें पन्नास गिरण्यांत कामावर जाणारे पन्नास हजार लोक सर्वच मुसलमान किंवा महार-चांभार नाहींत. . बेजबाबदार लोकांनीं चुकांवर चुका व घोडचुका करून सार्वत्रिक संपाची पाळी निष्कारण आणावी, सर्व कामगारांनीं मेंढराप्रमाणें त्यांच्या संपात सामील व्हावें आणि सर्वांनी मिळून आपलें भयंकर नुकसान करून घ्यावें हा न्याय कोठला ? एकमेकांच्या गळ्याला मिठी मारून सर्वानी संपाच्या समुद्रांत जीव दिला तरच ती कामगारवर्गाची चळवळ अशी या पत्रकारांची समजूत आहे काय ? कम्युनिस्टांची कामगार चळवळ ही खरी कामगार चळवळ नसून राज्यक्रांतीच्या उद्देशाच्या सिद्ध्यर्थ तें एक साधन आहे. सध्याच्या संपाचें समर्थन करूं पाहणाऱ्या ब्राह्मणेतर पत्रकारांना राज्यक्रांतीचें ध्येय मान्य आहे काय ? कम्युनिस्टांचीं मतें कबूल आहेत काय ? पोटापाण्यासाठी जर झगडा असता तर बहिष्कृत वगातले व मुसलमान कामगार यापूर्वीच्या सर्व संपांत जसे सामील झाले हाते तसे याहि संपांत सामील झाले असते. गेल्या वर्षा दीड वर्षात कम्युनिस्टांच्या चळवळीमुळे मुंबईच्या गिरणी कामगारांचे किती नुकसान झालें याची या ब्राह्मणेतर पत्रकारांना कल्पना तरी आहे काय ? उपासमारी, दंगे, मारामाऱ्या. फौजदारी खटले वगैरे अनेक आपत्ति कामगारांवर आल्या. त्यांतून डोकें वर काढण्यास त्यांना