गिरणी कामगारांचा संप व ब्राह्मणेतर पत्रे - Page 141

९९ गिरणी कामगारांचा संप व ब्राह्मणेतर पत्रे

संपाची धाड आली. ज्यांना इतक्यांत या सार्वत्रिक वेळ मिळाला न मिळाला

वर्गाची सर्व बाजूंनी सुधारणा मान्य नाहीं आणि कामगार राज्युक्रांतींची चळवळ

हालचाल न करतां, त्या लोकांनीं या प्रसंगीं कांही व्हावी अशी इच्छा आहे

विरोध न करतां, कम्युनिस्ट पुढाऱ्यांना यथेच्छ धुडगूस आत्मघातकी धोरणाला

घालूं द्यावा, कामगारांचें होत असलेलें भयंकर नुकसान उघड्या डोळ्यांगीं पाहावे,

अशी या ब्राह्मणेतर पत्रकारांची अपेक्षा होती काय ? कामगारवर्गाला निराशेनें

बेफाम बनविणें हें क्रान्तिवादाच्या दृष्टीनें युक्त असेल, परंतु देशावरील व

कॉँकणांतील शेतकऱ्यांना मुंबईच्या गिरण्यांतल्या मजुरीचा भाग मिळून होणारें

साहाय्य बंद पडावे, कामगार व शेतकरी वर्गाचा कर्जबाजारीपणा वाढावा, सावकार

व खोत यांच्या हातांत ब्राह्मणेतरांची शेंडी अधिक सांपडावी आणि मराठे वगैरे

लोकांना कर्जबाजारीपणामुळें, थोडीशी शिल्लक राहिलेली जमीनहि गहाण विक्रीत

करण्याचा प्रसंग यावा, हैं या ब्राह्मणेतर पत्रकारांना इष्ट आहे काय ? बेळगावात

किंवा पुण्यांत बसून मुंबईच्या गिरणी कामगारांविषयीं छापील पद्धतीची सहानुभूति

दाखविण्याचा मार्ग सोडून मुंबईला येऊन हे मराठे पत्रकार आपल्या जातिबांधवांच्या

रिथतीची चौकशी करतील तर त्यांना वस्तुस्थिती कळून येईल. विशेष

आश्चर्याची गोष्ट ही कीं, यांना ब्राह्मणांचा वास कोठेच खपत नाहीं, परंतु

कम्युनिस्ट ब्राह्मणांनी यांच्या जातभाईंना भुरळ घालून त्यांचा पुढारीपणा

बळकावला व त्यांचा वाटेल तसा उपयोग केला तरी तिकडे यांचे लक्ष गेले

नाहीं ! बरें हे स्वतः कम्युनिस्ट आहेत म्हणावें तर तसेंहि हे सांगत

ao CRC CSOD ee चा

कम्युनिझम हे भांडवलशाहीच्या विरोधातील एक मत आहे. सर्व मालमत्ता ही राष्ट्राची

मालमत्ता असावी, प्रत्येकाला त्याच्या गरजेप्रमाणे उदरपोषणाचा मानवी हक्क म्हणून मोबदला

मिळावा. त्यासाठी त्याची कर्तबगारी अगर जनसेवा लक्षात घेण्याची गरज नाही प्रत्येकाने

ाष्ट्राकरिता आपली सर्व शक्ती वेचावी व त्याबद्दल त्याला मजुरी न देता अन्नवस्त्र पुरेसे मिळेल

अशी व्यवस्था करावी हे कम्युनिझमचे मत आहे. मजुरांच्या तंत्राने चालणारे राज्य असावे

व समता ही सर्व स्तरात असावी हा आग्रह कम्युनिझमला पूर्णतः मात्य आहे आणि म्हणून

क्रांतीचा मार्ग हा जास्त सोयीस्कर वाटतो |

ट्रेड युनियन किंवा कामगारसंघ हे एक कामगार व इतर मजूर यांच्या हितसंबंधाची दाद

मालकवर्गाकडे लावण्याकरिता स्थापन झालेल्या संस्थांचे नाव आहे. या संस्था मजुरांना

भरपूर पगार, कामाचे कमी तास व इतर अनेक प्रकारचे फायदे मिळवून देण्याचा प्रयत्न

करतात. मालकमजुरांमधील नोकरीचे करार व्यक्तिशः न करता संघशः करावे व त्या

कराराचा फायदा सभासद नसलेल्या मजुरांनाही मिळावा असा या संस्थाचा उद्देश'

असतो. शाब्दिक वाटाघार्टीना यश आले नाही तर संप करणे हे साधन या संस्था उपयोगात

आणतात.