४०
नाक दाबल्याशिवाय तोंड उघडत नाहीं तें असें!
वन्हाडांतील जळगांव येथील सुमारें पांच हजार महार लोकांनीं थोड्या दिवसांपूर्वी एक जाहीर नोटीस प्रसिद्ध करून, हिंदुसमाजानें आपली अस्पृश्यता ठरीव मुदतीच्या आंत काढून टाकली नाहीं तर आपण परधर्माचा स्वीकार करूं म्हणजे मुसलमान किंवा खिश्ती होऊ, असे जाहीर केले होतें. ही नोटीस त्यावेळी आम्हीं आमच्या पत्रांत प्रसिद्ध करून त्या विषयावर एक अग्रलेखही लिहिला होता. जळगांवच्या महार लोकांचा हा जाहीरनामा म्हणजे नुसती एक पोकळ धमकी आहे असें ब्राह्मणी पत्रांनींच नव्हे तर ब्राह्मणेतर चळवळीत भागा घेणाऱ्या रा. जयराम नाना वैद्यासारख्यांनींही मत देऊन ती बाब थट्टेवर नेण्याचा प्रयत्न केला होता. परंतु जळगांवच्या महारसमाजाचे पुढारी थट्टा करावयास बसले नव्हते, त्यांचा पक्का निर्धार झालेला. होता. आज शेंकडों, हजारों वर्ष चालत आलेली गुलामगिरी त्यांना नाहींशी करावयाची होती आणि त्याकरितां आगाऊ पूर्ण विचार करून आणि आपल्या पूर्वजांच्या धर्माला, त्यांच्यांत सामाजिक विषमतेला व अन्यायाला आळा घालण्याचें सामर्थ्य नाही असें सिद्ध झाल्यावरून, मोठ्या कष्टाने कां होईना कायमचा रामराम ठोकण्याची आपल्या मनाची पुरी तयारी करूनच ते वरील आव्हान द्यावयास सिद्ध झाले होते. त्यांचें आव्हान पोकळ धमकी नव्हती, थट्टा नव्हती, पोरखेळ नव्हता; मात्र स्पृश्य वर्गातल्या लोकांनी त्यांची थट्टा करून व त्यांच्याशी पोरखेळ करून त्यांच्या न्याय्य मागण्यांना वाटाण्याच्या अक्षता लावण्याचा प्रयत्न केला होता. वरील आव्हान प्रसिद्ध झालें तेव्हां स्थानिक स्पृश्यांच्या पुढाऱ्यांनी महार मंडळीस पेंच घालण्याच्या उद्देशाने असा जबाब दिला कीं, तुम्हां अस्पृश्यांत वेगवेगळ्या जाती असून त्या एकमेकांचा विटाळ मानतात, एकमेकांना उच्चनीच लेखतातं, तरी प्रथम तुम्ही आपसांतला स्पर्शास्पर्श भेद काढून टाका, आपल्यांतली विषमता दूर करा, आणि मग आम्ही तमची अस्पृश्यता नाहीशी करू आणि तुम्हीं जे हक्क मागत आहां ते कबूल करूं,
परंतु स्पृश्य म्हणविणाऱ्या
सोवळ्या हिंदूंचा लपंडाव
जळगांवच्या महार पुढाऱ्यांनी तत्काळ ओळखला. ' न करत्याचा वार शनिवार ' या म्हणीप्रमाणे वरिष्ठ वर्णीय म्हणविणाऱ्या हिंदूंची ही सबब आहे, त्यान! मनापासून