नाक दाबल्याशिवाय तोंड उघडत नाहीं तें असें |! - Page 144

१०२ ` डॉ. बाबासाहेब आंबेडकर लेखन आणि भाषणे

अस्पृश्यतेचा नायनाट करण्याची इच्छा नाहीं, हे जळगावच्या बहिष्कृत वर्गाच्या पुढाऱ्यांना पक्के ठावूक होते. शिवाय, स्वतःच्या समाजांतलें भेदाभेद त्यांना नकोच होते, आपसांतली विषमता त्यांना नकोच होती, इतकेंच नव्हे तर आपसांत विटाळ किंवा जातिभेद पाळणें त्यांना मान्यच नव्हतें. अर्थात्‌ त्यांनी स्पृश्यवर्गीयांचें उलट आव्हान आनंदानें स्वीकारलें. त्यांनी बहिष्कृत वर्गातल्या महार, मांग, चांभार, भंगी वगैरे सर्व जातींची सहभोजनें घडवून आणून बहिष्कृत वर्गातले लोक आपसात विटाळ मानींत नाहींत किंवा सामाजिक विषमतेला थारा देत नाहीत हें सोवळ्या हिंदू लोकांच्या प्रत्ययाला आणून दिलें. सोवळ्या हिंदू लोकांना वाटलें होतें की, बहिष्कृत वर्गातल्या लोकांना आपसांतला भेदाभेद मोडण्याच्या कामीं यश येणार नाहीं आणि तसें झालें म्हणजे आपोआप, धर्मांतराची धमकी देणाऱ्यांची तोंडे बंद होतील परंतु सोवळ्या लोकांच्या दुर्वैवानें त्यांनीं घातलेला

पेंच फुकट गेला !

तोडीला तोड मिळाली आणि सोवळ्या लोकांच्या अंगावर त्यांचाच डाव उलटला. तेव्हां ते पुन: अळम्‌ टळम्‌ करूं लागले. या सुमारास डॉ. आंबेडकर हे त्या बाजूस गेले, होते व जळगांवच्या महार मंडळीनें त्यांचा सल्ला विचारला. धर्मातर केल्याशिवाय अस्पृश्यता दूर करवून घेण्याचा मार्ग कठीण आहे, त्या मार्गानें जाण्यास जो सोशिकपणा पाहिजे तो ज्याच्या अंगी नसेल त्यानी धर्मातर करण्याच्या विरूद्ध आपण नाहीं, अस्पृश्यतेच्या उच्चाटनाचा प्रश्‍न ज्याला जसा सोडवितां येईल तसा सोडवावा, असें डॉ. आंबेडकर यांनी स्पष्ट सांगितलें व '' बहिष्कृत भारता “ मध्ये जळगांवच्या महार मंडळीच्या जाहीरनाम्यावरील' अग्रलेखांतही तसेंच त्यांनीं पूर्वी प्रतिपादिलें होतें. सोवळे हिदुलोक अस्पृश्यता पूर करण्यास तयार नाहीत असें दिसून आल्यावर जाहीरनाम्यांतली मुदत पुरी झाली तेव्हा सुरवात म्हणून जळगांवच्या

बारा महारांनी मुसलमानी धर्म स्वीकारला !

आणि त्याच्या मागोमाग आणखीं शेंकडों हजारों लोक हाच मार्ग स्वीकारणार होते. बारा महारांनी धर्मातर केल्याबरोबर सोंवळ्या हिंदु लोकांचें डोळे खाडकन उघडले. जाहीरनाम्यातील धमकी पोकळ नाहीं याविषयीं त्यांची खात्री होऊन चुकली, आतां हजारों अस्पृश्य मुसलमान किंवा खिस्ती होणार, विशेषत: मुसलमान होणार आणि त्यामुळे हिंदूंचे संख्याबल कमी होऊन मुसलमानांचे संख्याबल वाढणार, मुसलमान झालेले अस्पृश्य आपल्या छातीवर बसून स्वतःचे मानवी हक्क प्राप्त करून घेणार या विचारानें सोवळ्या लोकांचे धाबे दणाणून