नाक दाबल्याशिवाय तोंड उघडत नाहीं तें असें |! - Page 145

नाक दाबल्याशिवाय तोंड उघडत नाही ते असें! १०३ `

गेले । जे महार वगैरे अस्पृश्य मानलेले लोक स्वतःला देवळांत जाण्यास मनाई असली तरी आपल्या धर्माची देवळें म्हणून त्यांचे संरक्षण करण्यास आतापर्यंत जिवावर उदार होऊन लढत आले ; तेच लोक आपल्या धर्माचे दुश्मन होणार, कदाचित धार्मिक कलहांमध्ये इतर मुसलमानांना देवळे फोडण्यास किंवा भ्रष्ट करण्यास मदत करणार, या भीतिप्रद विचारांचे काजवे पुराणमतवादी हिंदूंच्या डोळ्यांसमोर चमकू लागले. जे सोवळें व तोतये हिंदुसंघटनवादी लोक जळगांवच्या बहिष्कृत लोकांना मोठ्या तोऱ्यानें म्हणत होते, '' जा खुशाल परधर्मात जा ; ख्रिस्ती व्हा नाहीं तर मुसलमान व्हा. आमचे तुमच्यावाचून कांही अडललें नाहीं: ASR मेला आणि विटाळ गेला ' ही म्हण आमच्यात आहेच, '' तच लोक जेव्हां जळगांवच्या बहिष्कृतांनीं खरोखरच धर्मांतराची सुरवात करून दाखविली तेव्हां एकदम नरम आले ! बारा महारांच्या धर्मातराने हिंदुसमाजांत भयंकर खळबळ उडून गेली आणि आतां काहींही करून हा धर्मांतराचा प्रवाह येथेंच थांबविला पाहिजे असें सोवळ्या लोकांना वाटूं लागलें. तडजोडीची बोलणी सुरू झाली आणि सोवळ्या लोकांनीं अस्पृश्यांच्या उपयोगासाठी दोन सार्वजनिक विहिरी खुल्यां केल्या, इतकेच नव्हे तर तिघां गृहरथांच्या घरी बहिष्कृतांच्या पुढाऱ्यांना मुहाम पानसुपारीसाठी बोलावण्यात आलें आणि त्यावेळी स्पर्शास्पर्शाचे निर्बंध पाळण्यांत आले नाहीत. अशा रीतीनें जळगांवच्या बहिष्कृत पुढाऱ्यांनी

स्वतःच्या

खंबीरपणाने जय संपादिला

त्यांच्या या यशाबद्दल आम्ही त्यांचें मन:पूर्वक अभिनंदन करितो. विजयश्री नेहमी शूरांच्या गळ्यांत माळ घालते, हें इतर ठिकाणच्या बहिष्कृतांनी पूर्णपणे लक्षात ठेवलें पाहिजे. . धमकी द्यावयाची तर कधीही पोकळ देऊं नये, अगोदर विचार करून व मनाची पक्की तयारी करूनच धमकी द्यावी. जळगांवच्या बहिष्कृत पुढाऱ्यांनी धमकीची अंमलबजावणी करून सर्व बहिष्कृत वर्गाची पत राखली. नाहीं पेक्षां धर्मांतराची धमकी म्हणजे सोंवळ्या- हिंदू लोकांमध्यें एक थट्टेचा विषय झाला! असता आणि अस्पृश्यता निर्मूलनाचे काम आणखी कांहीं वर्ष लांबणीवर पडले असतें. या करिता बहिष्कृत वर्गातल्या लोकांना आमची अशी सूचना आहे कीं जळगावचा कित्ता गिरवावयाचा असेल तर, पोकळ धमकीने साधलं तर पाहावे असा विचार करून मात्र धर्मांतराची धमकी देऊं नये. बहिष्कृत वर्गातले लोक बोलतील त्याप्रमाणें करतील अशी पुराणमताभिमानी हिंदू लोकांची खात्री होऊन चुकली पाहिजे, आपल्या धमकीचा अचूक परिणाम झाला पाहिजे, तर जळगावच्या मंडळीप्रमाणे मनाचा पूर्ण निर्धार करूनच धमकी दिली पाहिजे. जळगांवच्या