नाक दाबल्याशिवाय तोंड उघडत नाहीं तें असें |! - Page 147

नाक दाबल्याशिवाय तोंड उघडत नाहीं तें असें ! १०५

बाबतींत सुरक्षितपणे टाळाटाळी करता येत असेल तोंपर्यंत डोळे मिटून खुशाल टाळाटाळी करावी, जोपर्यंत उपहास करून बहिष्कृतांच्या चळवळीला लघुत्व देता येईल तोपर्यंत लघुत्व द्यावें, जोपर्यंत बहिष्कृतांच्या अज्ञानाचा व संघटनेच्या अभावाचा फायदा घेतां येईल तोंपर्यंत तो घ्यावा, आणि बहिष्कृतांनीं नाक दाबलेच तर तोंड उघडावे आणि आपला धर्म व आपला समाज लवचीक आहे म्हणून बढाई मारावी. हें धोरण म्हणजे हिंदुसमाजाच्या मुर्दाडपणाचें लक्षण आहे. अशा मुर्दाडपणानें जगण्यात कोणत्याही समाजाला भूषण नाही. ' काकोऽपि जीवति चिराय बलिच भुंक्ते ' या वचनाप्रमाणे, कावळ्यांचे हजार वर्षे जगणे व हिंदुसमाजाचें हे हजारों वर्षे जगणें सारखेंच आहे !

अग्रलेख : बहिष्कृत भारत, ता. २१ जून १९२९.