- ४१
'देव आड येतो काय ?
जळगांव येथील बारा महारानी इस्लामचा स्वीकार केल्याबरोबर तेथल्या जीर्णमतवाद्यांचे.डोळे उघडले. आणि त्यांनीं दोन सार्वजनिक विहीरी बहिष्कतांच्या उपयोगासाठी मोकळ्या करून दिल्या आणि तीन वरिष्ठवर्णीय हिंदूंच्या घरी बहिष्कृत वर्गाच्या पुढाऱ्यांना पानसुपारीसाठीं जाहीर रीतीनें बोलवण्यांत आलें ही हकीकत आजच्या अग्रलेखांत* दिलीच आहे. परंतु तेवढ्यानें अस्पश्यता निवारण्याचा तेथला प्रश्न पूर्णपणें सुटलेला नाहीं. देवालयामध्यें पूर्वास्पृश्यांना जाऊ देण्यास तेथील जीर्णमतवादी लोक अद्यापि कबूल होत नाहींत असें समजतें. तें खरे असल्यास देवालयांत बहिष्कृतांना मज्जाव करणाऱ्या लोकांची त्यांच्या बुद्धिदौर्बल्याबद्दल कींव करावी किंवा त्यांना धूर्त म्हणावें, तें आम्हांस समजत नाहीं. बहिष्कृत वर्गातलें लोक जर हिंदू राहिले पाहिजेल तर त्यांना इतर हिंदुच्या बरोबरीनें सार्वजनिक हिंदुदेवालयें मुक्तद्वार असलीं पाहिजेत. कोणाच्या खासगी देवघरांत शिरण्याची बहिष्कृतांची इच्छा नाही. परंतु सार्वजनिक हिंदु देवालयामध्यें कोणाहि हिंदूना कां मज्जाव असावा ? सार्वजनिक दिहीरीवर बहिष्कृतांनी इतरांबरोबर पाणी भरण्यास जर हरकत नाहीं अथवा त्यांना आपल्या घरीं जाहीर रीत्या पानसुपारीस बोलावल्यानें व त्यांच्यांत मिसळल्याने जर जीर्णमतवाद्यांच्या सोवळ्याची घडी बिघडत नाहीं, तर केंवळ सार्वजनिक हिंदु दवालयांच्याच बाबतींत बहिष्कृतांना आडकाडी ठेवण्यास कांही कारण दाखवितां येईल काय ? जळगांवच्या सोवळ्या हिंदूंना स्वतःला विटाळ बाधण्याची भीति आता वाटत नसून फक्त देवळांतले देव विटाळले जातील अशी भीति वाटते असें समजावयाचे काय ? खरें पाहिलें असतां देवाला कोणाच्याच व कसल्याच विटाळाची भीति नाहीं. देव जसा ब्राह्मणादि हिंदूंचा आहे तसाच तो बहिष्कूतांचाहि आहे. बहिष्कृतांच्या स्पर्शाने जर देवळांत जाणाऱ्या इतर हिंदूना विटाळ होत नाहीं तर देवांच्या मूर्तीला विटाळ कां बाधावा ? स्वत:च्या घरांत अस्पृश्यता पाळावयाची नाहीं, देवळांत मात्र पाळावयाची हा खरोखरच उलटा न्याय, समजला पाहिजे. एक तर जीर्णमतवाद्यांचा नेहमीच्या अप्रयोजकपणाचा हा एक भाग असला पाहिजे किंवा बहिष्कृतांना विहिरींवर पाणी भरू देणें व त्यांना आपल्या घरी पानसुपारीस बोलावें हे त्यांच्या डोळ्यांना पाणी लावून त्यांचें
* पाहा, अप्रलेख क्रमांक ४०.