देव आड येतो काय ? - Page 149

देव आड येतो काय ? १०७

तात्पुरते समाधान करण्याचे डाव तरी असले पाहिजेत. ज्या दोन सार्वजनिक विहिरी अस्पृश्यांसाठी खुल्या करण्यांत आल्या आहेत त्यांच्यावर बाकीच्या हिंदूंना बिनबोभाट बहिष्कार घालून आपल्या पाण्याची सोय दुसऱ्या खाजगी किंवा सार्वजनिक विहिरीवर करावयाची असा तर डाव नसेल ना ? पानसुपारीची गोष्ट ज्या त्या व्यक्‍तीच्या खुषीची असल्यामुळें अस्पृश्यांना समारंभांच्या वेळीं आपल्या घरीं बोलावून त्यांना स्पर्शास्पर्श सोडून वागविण्यास बांधलेला आहे. बहिष्कृतांचें समाधान झालें म्हणजे हळूच पूर्वीचा स्पृश्यास्पृश्य भेद कायम ठेवायवाचा. ज्यांनीं बहिष्कृतांना प्ररवां आपल्या घरीं पानसुपारीस बोलावले त्यांना हळूच प्रायश्चित घेउन मोकळें होता येईल आणि कदाचित त्याच वेळी पानसुपारीस हजर असलेल्या गृहस्थांनीं स्नान करुन आपलीं जानवीं बदललेलींहि असतील ! देवळांची गोष्ट तशी नाहीं. देवळांत बहिष्कृतांनीं जाण्याचा पायंडा पडला म्हणजे विटाळाची ब्याद कायमची मागें लागेल व अखेरीस विटाळाची कल्पनाच सोडून देणें भाग पडेल. अर्थात, जळगांव येथील विशिष्ट परिस्थितीचा विचार करतां, देवळांच्या बाबतींत बहिष्कृतावरील बहिष्कार कायम ठेवूं पाहणें हा शुद्ध अप्रयोजकपणा तरी असला पाहिजे किंवा धूर्तपणा तरी असला पाहिजे ; तिसरें अनुमान शक्‍य नाहीं.

प्रासंगिक विचार : बहिष्कृत भारत, ता. २१ जून १९२९.