४२
मजूरपक्षाचें मंत्रिमंडळ
आतांपर्यंत गेलीं पांच वर्षे इंग्लंडांत कॉन्झरवेटिव पक्ष अधिकारारूढ होता. नियमाप्रमाणें पार्लमेंटची साधारण निवडणूक नुकतीच झाली व या निवडणुकींत कॉन्झरवेटिव पक्षाचा पराभव होऊन मजूरपक्षाचे सर्वांत अधिक
सभासद निवडून आलें. अर्थात कॉन्झरवेटिव पक्षाच्या मंत्रिमंडळाला राजीनामा
देऊन मजूरपक्षाच्या मंत्रिमंडळासाठीं जागा मोकळ्या करून देणें भाग पडलें. आतां मि. रॅम्सेमँकडोनल्ड यांच्या प्रमुखत्वाखाली ब्रिटनचें नवीन मंत्रिमंडळ स्थापित झाले आहे. मजूरपक्ष अधिकारारूढ झाल्याची ही दुसरी खेप होय. मजूरपक्षाचें पहिलें मंत्रिमंडळ १९२४ सालीं अस्तित्वांत आलें होतें. परंतु त्या पक्षाच्या सभासदांचें संख्याधिक्य पार्लमेंटमध्ये असावें तितकें नसल्यामुळें त्या मंत्रीमंडळालां भीतभीतच आपले काम चालवावें लागलें व इतकें करूनही शेवटीं त्याची कारकीर्द अल्पायुषी ठरली. या खेपेसहि पार्लमेंटमध्ये मजूरपक्षाच्या सभासदांची संख्या कॉन्झरवेटिव व लिबरल यांपैकीं कोणत्याही एका पक्षाच्या सभासदापेक्षां जास्त असली, लिबरलपक्षापेक्षां फारच मोठी असली तरी काँन्झरवेटीव-व लिबरल हे दोन पक्ष मजूरपक्षाच्ण विरुद्ध एक झाल्यास मजूर- पक्षाचा पार्लमेंटमध्ये पराभव होऊं शकेल. कॉन्झरवेटिव पक्ष उघडपणे भांडवलशाही, जमीनदारशाही व साम्राज्यवाद यांचा कट्टा पुरस्कर्ता आहे आणि लिबरल पक्ष त्या पक्षाच्या विरुद्ध असला तरी तो भांडवलशाही, जमीनदारशाही व साम्राज्यवाद यांचा पक्षपाती आहे. मजूरपक्षाच्या सोशियालिस्ट मतांची अंमलबजावणी धडाडीनें होऊं लागली तर तें त्याला केव्हांहि खपणार नाहीं आणि तसाच प्रसंग आल्यास तो कॉन्झरवेटिव पक्षाला मिळण्यासहि कमी करणार नाहीं. अर्थात या खेपेसहि मजूरपक्षाच्या मंत्रिमंडळाची शाश्वती नाहीं. त्याला जपून जपूनच आपलें काम चालवावें लागणार आहे. मजूरपक्षाची कारकीर्द शक्य तितक्या लवकर संपुष्टांत आणण्यासाठी भांडवलशाहीचे पुरस्कर्ते आपली पराकाष्टा करितील हें स्पष्ट आहे. खरा लढा कॉन्झर्वेटिव व मजूर या पक्षांमध्ये असून लिबरल पक्ष हा मध्यंतरीच्या काळाचा अवशेष आहे. जोपर्यंत मजूरपक्ष अस्तित्वांत येऊन बचावला नव्हता तोंपर्यंत लिबरल पक्षाच्या अस्तित्वाला सबब होती, त्यांच्या अस्तित्वाची आवश्यकता होती, आता लिबरल पक्षाच्या अस्तित्वाची कांहीं आवश्यकता राहिलेली नाहीं. त्याच्या आयुष्याला झपाट्याने ओहोटी