मजूरपक्षाचें मंत्रिमंडळ - Page 151

मंजुरपक्षांचें मंत्रिंडळ . १०९

लागली आहे. त्या पक्षांतील होतकरू. वं ASHER लोक एका मागून एक याप्रमाणे कोणी मजूरपक्षास तर कोणी कॉन्झर्वेटिव पक्षास मिळत आहेत. लिबरल पक्षाला या पुढें केव्हांतरी अंधिकारारूढ होण्याची आशा आतां बिलकूल राहिलेली नाहीं मात्र सध्यां त्याच्या अंगीं विघातक शक्ति आहे. कारण विरुद्ध पक्षाला मिळून अधिकारारूढ पक्षाला अधिकारच्युत. "करण्याची किल्ली त्याच्या हाती आहे. त्यामुळें मजूर पक्षाच्या मंत्रीमंडळाला तारेवरं कसरत करण्याप्रमाणें आपंल्या राज्यंकारभाराचा तोल सांभाळणे भागं आहे

मजूर पक्षाचें राजकारण

मजूर पक्षाचें राजकारण बव्हंशी समाजसत्तावादी आहे. देशांतील उद्योगधंदे

समाजाच्या मालकीचे असावे, भांडवलशाहीच्या हाती सत्ता राहूं नये, भांडवलशाही

नाहींशी करून तिच्या जागीं खरी लोकसत्ता स्थापन करावी, बेकारी नाहींशी करून

ज्यांना काम देतां येत नसेल त्यांच्या उदर निर्वाहाची तरतूद करावी, देशांतल्या “प्रत्येक व्यक्तीला स्वतःची उन्नति करण्यास व कर्तबगारी दाखविण्यास पूर्ण

संधि देण्यांत यावी, असे मजूर पक्षांचें स्वदेशाच्या बाबतीत धोरण असून जगांत

शांतता नांदविणें, युद्ध होऊं न देणें, प्रत्येक देशाचें स्वातंत्र्य कबूल करणें आणि

जगांतील सर्व जनतेचे हितसंबंध एकरूप करणे असे परराष्ट्रीय धोरण

आहे. तथापि इंग्लंडांतील मजूरपक्ष क्रांतिवादी नाहीं. कम्युनिस्ट पक्षाच्या

क्रांतिवादाला तो विरूद्ध असून मजूरपक्ष व कामगारसंघ यांमधून कम्युनिस्टांची

हकालपट्टी करण्यांत आली आहे. आपलें ध्येय साधावयाचें, परंतु क्रमाक्रमाने

तें गाठावयाचें; त्याकरितां जालीम उपाय, अत्याचार व रक्तपात यांचा उपयोग

करावयाचा नाहीं, सनदशीर मार्गानें लोकमत आपल्या बाजूचें करून आपल्याला

इष्ट असतील त्या सुधारणा घडवून आणावयाच्या, असें मजूरपक्षाचें धोरण

आहे. इंग्लंडच्या मजूरपक्षांत फेनर ब्रॉक्वेसारखे जहाल स्पष्टवादी पुढारी

आहेत, तसेच टॉमस टर्नर यांच्यासारखे अगदीं मवाळ व जुन्या मुत्सुद्दीगिरीला

अनुसरणारेहि पुढारी आहेत.

हिंदुस्थानच्या बाबतीत धोरण.

मजूरपक्षाच्या मंत्रिमंडळाचें धोरण हिंदुस्थानाच्या बाबतींत कशाप्रकारचें

असेल हा प्रश्‍न यावेळीं मनांत येणें स्वाभाविक आहे. वर सांगितल्याप्रमाणें

मजूरपक्षाच्या मंत्रिमंडळाच्या आयुष्याची दोरी लिबरल पक्षाच्या हातीं आहे

स्वतःच्या देशांतील कामगारवर्गासंबंधाचें इतकें निकडीचें प्रश्‍न त्याच्यापुढे

आहेत कीं ते सोडवितांना त्याला पुरेवाट होईल. ते प्रश्‍न सोडविण्याच्या

बाबठींतहि त्याला तेथल्या कामगारवर्गाचें पूर्ण समाधान करणें शक्‍य नाहीं.

चाय ६४१ - १°