मजूरपक्षाचें मंत्रिमंडळ - Page 152

aag डॉ. बाबासाहेद आंबेडकर लेखन आणि भाषणे

सध्यां ब्रिटनमध्ये खाणींतल्या कामगारासंबंधाचा प्रश्‍न अत्यंत निकडीचा आहे आणि सध्याच्या पार्लमेंटमध्ये खाणींतल्या कामगारांचे पुष्कळ प्रतिनिधि निवडून आलेले आहेत. तथापि त्या प्रश्‍नाचा स्वतःच्या मनाप्रमाणें निकाल लावणें व खाणींतल्या कामगारांचे पुरेसे समाधान करणें मजूर पक्षाच्या मंडळाला शक्य नाहीं, असें एव्हांपासूनच मजूर पक्षाचे पुढारी म्हणूं लागले आहेत. खुद्द इंग्लडांतल्या कामगारवर्गाच्या बाबतींत जर ही स्थिती तर हिंदुस्थानच्या बाबतींत आशा बाळगण्यास फारशी जागा नाहीं हें सांगावयास नकोच. कॉन्झर्देटिव पक्षाच्या मंत्रिमंडळापेक्षा थोड्या अधिक सहानुभूतीने मजूर पक्षाचे मंत्रिमंडळ हिंदुस्थानकडे पाहील हैं मात्र खरें आहे. कामगार वर्ग व अन्याय पीडित अस्पृश्य वर्ग यांच्या संबंधाने केव्हांहि मजूर पक्षाच्या मंत्रिमंडळाला कॉन्झर्वेटिव किंवा लिबरल पक्षाच्या मंत्रिमंडळाला वाटेलं त्या पेक्षा अंधिक सहानुभूती वाटावी हें स्वाभाविक होय.

प्रासंगिक विचार : बहिष्कृत भारत, ता. २१ जून १९२९.