४३
ब्राह्मण-आदिद्रविङ विवाहः
मद्रास येथें ता.. १० जून रोजीं भिन्नजातीय वधुवरांचा एक संस्मरणीय विवाह
दिवाण बहादुर आर. रामचंद्रराव, सी. एस. आय., मि. सी. डी. कनिंगहॅम, रा. ब. कंदास्वामी चेट्टी, रा. ब. डॉ. सी. नटेश मुदलियार, मि. जी. रंगय्या नायडू, मि. व्ही. गजेंद्र मुदलियार, मि. जयवेलू वगैरे पुढारी मंडळी या विवाहाला हजर होती. वधूचे नांव सीतादेवी असें असून तिचा भाऊ तेथील सरकारी छापखान्यामध्यें नोकरीस आहे. वरांचें नांव श्री नटेश अय्यर असें असून त्याचे वडील कै. श्रीकंठ शास्त्री हे कोइंबतूर येथील हायकोर्ट जज्ज होते. वधु व वर या उभयतांचे आईबाप हयात नाहींत. वधूचे शिक्षण आतापर्यंत
- थर्ड फॉर्मपर्यंत झालें आहे. विवाहविधि आर्यसमाज पद्धतीनें झाला. विधि झाल्यावर लगेच जाहीर सभा भरविण्यांत आली व अध्यक्षस्थानी डॉ. वरदराजलू नायडू यांची योजना करण्यांत आली. अध्यक्षांनी आपल्या भाषणांत, हा विवाह म्हणजे वरिष्ठ जातींच्या लोकांनीं आजपर्यंत शतकानुशतके बहिष्कृत वर्गावर जुलूम करून जें पाप संपादिलें आहे त्याचें अंशतः क्षालन होय. जातिभेदानें हिंदुसमाजाचीं शकलें करून टाकलीं आहेत तीं पुनः जोडण्याचा मार्ग हाच आहे. अशा मिश्र विवाहानें परस्परांशी बद्ध झालेल्या जोडप्यांना थोडाबहुत त्रास पोंहचावयाचाच, परंतु त्याला भिऊन चालावयाचें नाहीं, कायदेशीर अडचणी दूर करण्याकरितां भिन्न जातीय वधुवरांचें विवाह मॅरेज रजिस्ट्रेशन अँक्टाखाली नोंदावें हें चांगलें. रा. ब. डॉ. नटेश मुदलियार यांनीं आपल्या भाषणांत सांगितलें कीं, असले विवाह साजरे करून आपण चैतन्य रामानुज, स्वामी दयानंद वगैरे थोर पुरुषांची शिकवणच अंमलात आणीत आहों. दि. ब. रामचंद्रराव म्हणाले कीं, जातीभेदाचे बंड माजवून आपण हिंदू लोकांनी आपला समाज निःसत्त्व करून टाकला आहे आणि जातींभेदामुळे
साऱ्या जगांत आपलें हंसें होत आहे. प्रस्तुत सारख्या विवाहांमुळें जातिभेद
शेवटीं नामशेष होईल यांत शंका नाहीं. इतर कित्येक गृहस्थांचीहि भाषणे
झाली. पण विवाहाला हजर राहण्याचे श्री. सत्यमूर्ती यानीं कबूल केलें होते,