ब्राह्मण-आदि द्रविड विवाह - Page 154

११२ डॉ. बाबासाहेब आंबेडकर लेखन आणि भाषणे

परंतु अखेरीस त्यांनीं हजर राहण्याचें टाळलें. तथापि, त्याची भरपाई दि. ब. रामचंद्ररावासारखें वयोवृद्ध, सन्मान्य व विद्वान्‌ ब्राह्मण गृहस्थ हजर राहल्यानें झाली, असें डॉ. मुदलियार यांनीं सभेतच बोलून दाखविलें. सत्यमूर्तीचा आजपर्यंतचा इतिहास लक्ष्यांत घेतां त्यांनीं धरसोडी केली त्याबद्दल आम्हांस तरी आश्चर्य वाटत नाहीं. .असो. मद्राससारख्या जातिभेदाचे कडक निर्बंध व अस्पृश्यता यांनीं पराकाष्टेच्या ग्रस्त झालेल्या प्रांतांत वरील सारखा विवाह घडून यावा आणि त्याला हजर राहून ब्राह्मणादि स्पृश्य वर्गातल्या गृहस्थांनी उघडपणे सहानुभूती दाखवावी, हैं खरोखरच भावी काळाचें शुभचिन्ह समजलें पाहिजे. |

प्रासंगिक विचार : बहिष्कृत भारत, ता. २१ जून १९२९.