४४
समाजसमतेचे विरोधक
समाज-समता-संघाची चळवळ सुरू होऊन त्या चळवळीचा अस्पृश्यतानिर्मूलनाच्या कामी उपयोग होऊ लागला. अस्पृश्य मानलेल्या जातीतल्या लोकांची मौजीबंधनें होऊन ते यज्ञोपवीतें धारण करूं लागले, गायत्री मंत्राचा उच्चार करू लागले, सहभोजनें व थोडे कां होईनां भिन्नजातीय वधुवरांचे विवाह होऊ लागले, त्यामुळें चातुर्वण्याच्या नांवाखालीं समाजांत विषमतेचें साम्राज्य माजवूं पाहणाऱ्या आणि स्वतःची जातिश्रेष्ठता मिरविणाऱ्या लोकांच्या काळजात धडकी भरली आहे. समतेसंबंधाच्या चळवळीनें आपल्या जातिभेदपद्धतीचें बालाग्र वांकड़ें व्हावयाचें नाहीं, असें म्हणून त्या चळवळीचा उपहास करणारे व तिला लघुत्व देऊं पाहणारे हे लोक मनांतून घाबरून गेले आहेत, यांविषयी बिलकूल शंका नाहीं. नाहींपेक्षां इतका जळफळाट त्यांनीं दाखविला नसता. विशेषतः हिंदुसंघटनेच्या चळवळीत पुढाकार घेणाऱ्या कित्येक लोकांच्या डोळ्यांत समतासंघाची चळवळ सतत सलत असते. बहिष्कृत वर्गाची स्वतंत्र चळवळ आणि समाज-समता-संघाची चळवळ या चळवळी नसत्या तर अस्पृश्यतानिवारणाचा प्रश्न फसवाफसवी करून आपण बाजूला काढला असता, बहिष्कृत वर्गाच्या स्थितींत फारशी सुधारणा न करता व त्यांच्यात स्वाभिमानार्चे वारें शिरण्याला अवसर न देतां, मुसलमान व खिश्ती समाजांशी भांडण्यांत त्यांचा हवा तसा उपयोग करून घेतला असता, असें तोतया हिंदुसंघटनावाद्यांना व ढोंगी शुद्धिप्रचारकांना वाटणें स्वाभाविक आहे. परंतु बहिष्कृत वर्गाची स्वतंत्र चळवळ व समाज-समता प्रस्थापित करण्याची चळवळ या आता दृढमूल
झाल्या आहेत, त्या भक्कम तत्त्वांवर उभारलेल्या आहेत, त्यांची तत्त्वे बहुजन- समाजांत प्रसार पावत आहेत आणि निंदा व उपहास यांचा परिणाम होऊन
त्या दबल्या जाण्याचा आता बिलकूल संभव नाहीं. या चळवळींची निंदा व
उपहास करणारे लोक जर खरोखरच हिंदुसंघटनेचे पुरस्कर्ते असतील, त्यांना
संघटनाची खरोखरच आस्था असेल आणि आपली
संघटनाची चळवळ लफंगेगिरीची
आहे असा सार्वजनिक ग्रह होऊ नये असे जर त्यांना वाटत असेल तर त्यांनी चूप
बसावे यातच त्यांचा शहाणपणा आहे. डॉ. आंबेडकर, श्री. देवराव नाईक,
बापूसाहेब सहस्त्रबुद्धे, श्री. प्रधान बंधु, श्री. शिवतरकर इत्यादि मंडळीवर वैयक्तिक