११४ डॉ. बाबासाहेब आबेडकर लेखन आणि भाषणे
टीका करून, त्यांच्याविषयी लोकमत कलुषित करण्याचा प्रयत्न करून अस्पृश्यतानिवारण्याची व समतावादाची चळवळ नेस्तनाबूद होईल अशी जर या दुधखुळ्यांची कल्पना असेल तर त्यांची कीवच केली पाहिजे. मिसेस पार्टगेंटन नांवांची एक बाई केरसुणी हातात घेऊन अटलांटिक महासागर मागे हटवावयास पाहात होती. अशी जी एक आख्यायिका आहे त्या आख्यायिकेंतल्या प्रयत्नाप्रमाणेंच हे प्रयत्न हास्यास्पद आहेत. : खोट्या गोष्टी, खोटे आरोप, बाष्कळ कोटीक्रम इत्यादी साधनाचा उपयोग करून बहिष्कृत वर्गाची. स्वतंत्र चळवळ व समाजसमतावाद ही चिरडून. टाकू पंहाणारें लोक ' मी हांसते लोकांना व शेंबूड माझ्या नाकाला, या म्हणीप्रमाणें कसे वागणारे आहेत हे त्यांची VERY उचड.करून आणि तोंडावर बुरखा घेऊन हल्ला करणाऱ्या लोकांचे शिखंडी स्वरूप जगाला दाखवून त्यांची सर्व जगात बेअब्रू करणें कठीण नाहीं. परंतु आम्हाला आमच्या चळवळीच्या "तत्त्वांसंबंधाने इतकी खात्री आहे कीं, या विरोधकांना त्यांच्याच साधनांचा, उपयोग करून ' सळो की पळो ' करून सोडण्याची आवश्यकता आम्हास, भासत नाहीं. शिवाय, यातल्या बऱ्याचशा विरोधकांची इतर बाबतीत लोकांमध्यें अगोदरच फटफजिती होत आहे. त्यांत आणखी भर घालून त्यांना जगातील जिणे असह्य करावें अशी आमची इच्छा नाही
आडगोळ्या मारणाऱ्या शिखंडींना पुढें खेचून
त्यांची काळी. तोंडे जगाला. दाखविणें म्हणजे त्या प्राण्यांची नसती जाहिरात देणें आहे. असो. अमका गृहस्थ समतावादी म्हणवितो, परंतु तो अमक्या जेवणाला हजर नव्हता, किंवा .त्याने आपल्या घरी जेवणासाठी वेगवेगळ्या जातीच्या माणसांना बोलावलें असतां त्यानें बाहेरून स्वयंपाक करवून. आणला, असल्या गोष्टी प्रसिद्ध केल्याने समतेची चळवळ कुचकामी ठरेल अशी या भ्रमिष्ठांची समजूत असेल “तर -तो त्यांचा शुद्ध भ्रम आहे. सहभोजनाला मागें पंचवीस वेळा हजर राहिलेला मनुष्य कांही अडचणीमुळे एखाद्या सहभोजनाला हजर VE शकला नाहा म्हणून तो भ्याला असे होत नाहीं, तसेंच घरगुती अडचणीमुळे एखाद्याला स्वतःच्या -घरात स्वयपाक -.करतां आला नाहीं म्हणूनही तो ढोंगी ठरत नाही. अस्पृश्य मानलेल्या. लोकांशी पंक्तिभेद न पाळता तो जेवावयास बसतो आणि अस्पृश्य मानलेल्या जाताँच्या माणसांनी वाढलेले अन्न त्याला चालतें. याच गोष्टी महत्त्वाच्या आहेत. त्या महत्त्वाच्या नाहीत, असें ज्यांचे म्हणणें असेल त्यांना तसें करून दाखवावं. हा तपशिलाचा प्रश्न झाला. परतु सर्वात महत्त्वाच मुद्दा आहे ता हा की, कोणतीही सामाजिक सुधारणा ग्राह्य किंवा अग्राह्य