समाजसमतेचे विरोधक ११७
तेव्हा होवो, तो अस्तित्त्वांत असेल तोंपर्यंत आपल्या जातीला वरिष्ठपणाचा टेंभा मिरवावयाला मिळाला पाहिजे. यापलीकडे कांहीं या
ढोंगी संघटनावाद्यांचें ध्येय
नाही, हिंदुधर्माविषर्यी आणि जुन्यापुराण्या स्मृतिपुराणादि ग्रंथांविषयी त्यांना प्रेमाचा इतका उमाळा येतो याचें कारण एवढेंच कीं, त्यांच्यामुळे त्यांना स्वतःच्या जातीचें स्तोम माजवितां येतें. तों फायदा मिळाला नाही तर त्यांच्या प्रेमाला ओहोटी लागलीच म्हणून समजावे ! काहीं जातीं आपणाला ब्राह्मण म्हणविणाऱ्या आहेत. त्यांची अर्थातच आपल्या जातीचा पहिला मान राखून ठेवण्यासाठी धडपड चालत असते. या ब्राह्मणांत अनेक पोटजाती आहेत, त्या एकमेकांना उच्चनीच समजतात, एकमेकांच्या उखाळ्या पाखाळ्याही काढतात; परंतु जातिभेद कायम ठेवण्याच्या कामी सर्व एक होतात. आपल्याला लोकांनी ब्राह्मण म्हणावें, मग कसलेहि ब्राह्मण म्हटलें तरी चालेल; विषारी ब्राह्मण म्हणा किंवा अशकुनी ब्राह्मण म्हणा, आर्य ब्राह्मण म्हणा किंवा अनार्य ब्राह्मण म्हणा, षटकर्मी ब्राह्मण म्हणा किंवा त्रिकर्मी ब्राह्मण म्हणा, आचारी ब्राह्मण म्हणा किंवा पाणके ब्राह्मण म्हणा, धूर्त ब्राह्मण किंवा मूर्ख ब्राह्मण म्हणा, भाजीखाऊ ब्राह्मण म्हणा, किंवा मटनखाऊ ब्राह्मण म्हणा, मासेखाऊ ब्राह्मण म्हणा किंवा कोंबडीखाऊ ब्राह्मण
म्हणा,
कसलेही ब्राह्मण म्हणा परंतु ब्राह्मण मात्र म्हणा,
असा या ब्राह्मण म्हणविणाऱ्या लोकांचा आग्रह असतो. त्यानंतर राहिले क्षत्रिय, वैश्य म्हणविणारे लोक. यांना ब्राह्मणांनी आपल्या कामापुरते क्षत्रिय वैश्य म्हणून प्रत्यक्ष व्यवहारांत शूद्र समजून वागविले इतकेंच नव्हें तर ब्राह्मणांखेरीज बाकीचे सगळे हिंदू शूद्र आणि अतिशूद्र असें म्हटले तरी चालतें. ब्राह्मणांच्या घाणेरड्या पायाचें पाणी पिण्यास देखील हे तयार होतात, मात्र यांना आपल्या खालच्या जातीवर जुलूम गाजवावयास व वर्चस्व मिरवावयास मिळाले म्हणजे झालें. खरे गुलाम जगात कोण असतील तर हे ब्राह्मणांचे बगलबच्चे होत. याखेरीज वारकरी, रामदासी वगैरे पंथांचे धर्माभिमानी म्हणविणारे लोक. हे आपल्यास साधुसंतांचे अनुयायी म्हणवितात, परंतु साधुसंतांचा मुख्य उपदेश जो समतेनें इतरांना वागविण्याचा तो धाब्यावर बसविणारे जर कोण असतील तर हेच सांप्रदायी लोक होत. एकनाथ, तुकाराम यांच्यासारख्या साधूंची नावे हे लोक मोठ्या प्रेमाने घेतील आणि त्यांच्या कविता आळवून आळवून म्हणतील, त्या साधूंच्या चमत्कारांच्या दंतकथा शक्य तितक्या अतिशयोक्तीनें वर्णन करतील, परंतु त्या