समाजसमतेचे विरोधक - Page 160

११८ . डॉ. बाबासाहेब आंबेडकर लेखन आणि भाषणे

साधूंनी प्रतिपादिलेल्या न्यायबुद्धीची, भूतदयेची, समतावादाची व उदार विचारांची हटकून पायमल्ली करतील ! कारण यानाही जातिदुरभिमानानें पछाडलेले असतें. रामदासी पंथाचे लोक तर पहिल्यापासून जातिदुरभिमानी व कडवे म्हणून प्रसिद्ध आहेत. त्या पंथाचा संस्थापकच जातिदुरनिमानानें ग्रासलेला होता व म्हणून वारकरी संप्रदायाशी स्पर्धा करणारा वेगळा संप्रदाय त्यानें स्थापिला. अशा अनेक प्रकारच्या समताविरोधकांशी अस्पृश्यतांनिमूलन व समाजसमतावाद या चळवळींना सामना करावयाचा आहे. परंतु या चळवळी

न्याय, सत्य व विवेक

यांच्या पायावर उभारलेल्या असल्या कारणानें त्या सर्व विरोधकांना पुरून उरतील आणि त्यांचाच शेवटी जय होईल याविषर्यी आमची खात्री आहे.

— oe os meen eer ~ e eae e अग्रलेख : बहिष्कृत भारत, ता. १२ जुलै १९२९.