४५
दटावणीची भाषा
जळगांव (वऱ्हाड)* येथील पांच हजार मंडळीनें तेथल्या इतर 'हिंदुसमाजास आपली अस्पृश्यता दूर करण्याच्या बाबतीत ठरीव मुदतीची नोटीस 1 दिली होती आणि ती मुदत टळून गेली तरी हिंदुसमाजानें दाद घेतली नाहीं तेव्हां नोंटिशींत आगाऊ कंळविल्याप्रमाणे धर्मातंरास आरंभ A करण्याचें ठरून प्रथम बारा इसमांनी मुसलमानी धर्माची दीक्षा घेतली. त्यावरून सोवळ्या हिंदूंचे डोळे खाडकन् उघडले आणि त्यांनीं महारांच्या उपयोगाकरिता दोन विहीरी खुल्या करून दिल्या वगैरेसंबंधानें आम्ही गेल्या अंकी जे लिहिलें ते कित्येकांना रुचलेलें दिसत नाहीं. आमचीही अपेक्षा तें सर्वांना रुचेल अशी नव्हती. परंतु खरी बाजू पुंढे माडावयाची असल्यास ती अमक्या तमंक्याला आवडेल किंवा नाहीं याचा विचार करुन चालत नाहीं. आमच्या टीकाकारांनी 'चोर तो चोर आणि पुन: शिरजोर ह्या म्हणीप्रमाणे आपले वर्तन चालविलें आहे. डॉ. आंबेडकरांनीं'जळगांवच्या महारांना धर्मांतरापासून परावृत्त होण्याचा उपदेश करावयाचा होता, असें या टीकाकारांचें म्हणणें आहे. डॉ. आंबेडकरांनी धर्मातराचां उपदेश केला नाहीं तर जे लोक स्वतःच्या बुद्धीनें धर्मांतराचा तोडगा उपयोगांत आणून स्वतःची अस्पृश्यता दूर करून घेण्यास तयार झालें त्यांनां आंबेडकरांनी तुम्हीं तसें करूं नका, धर्मांतर न करता अस्पृश्यतेचा प्रश्न सोडवून घ्या, असे सांगितलें नाहीं हें खरें आहे. तसें न सांगण्याचें कारण यापूर्वी आम्हीं जाहीर केलेंच आहे. एक तर आंबेडकराना हिंदुधर्मात राहून अस्पृश्यता STATA शक्य वाटत असले आणि त्याकरितां कांहीं काळ वाट पाहण्याची त्यांची तयारी असली म्हणून बाकीच्या सर्वांना ती शक्यता पटलीच पाहिजे असें नाहीं आणि सर्वाना इतका काळ सोशीकपणा दाखविणें शक्य आहे असौंहे नाहीं. डॉ. आंबेडकरांना कांहीं अडचणी तितक्या तीव्रतेने भासत नसतील, म्हणून बाकी सर्वानाहि त्या भासत नसतील असें म्हणतां यावयाचे नाहीं. वेगवेगळ्या ठिकाणीं वेगवेगळी परिस्थिति असते. शिवाय डॉ. आंबेडकरांनीं तरी कोणाच्या विश्वासावर हिंदुधर्मात राहून अस्पृश्यता घालविण्याची खात्री द्यावी ? एक दोन पिढ्यांत अस्पृश्यता
* (जिल्हा बुलडाणा)
} पाहा, परिशिष्ट, क्रमांक : ५
^ पाहा, परिशिष्ट क्रमांक : ७