दटावणीची भाषा - Page 162

920 डॉ. बाबासाहेब आंबेडकर लेखन आणि भाषणे

औषधालाहि उरणार नाहीं असा आशीर्वाद देणारे आणि डॉ. आंबेडकरांना ' आस्ते कदम “ चालण्याचा उपदेश करणारे ' भाला ' कारासारखे टीकाकार एरव्ही नेहमी आपल्या उद्दाम लेखनानें व भाषणांनीं बहिष्कृत वर्गाला चिडवीत असतात आणि बहिष्कृत वर्गाचे मानवी हक्क धर्माच्या व रूढीच्या नांवावर नाकबूल करणाऱ्या आपल्या जातभाईची सणसणीत कानउघाडणी करण्याचें टाळीत असतात, दटावणीची भाषा वापरून बहिष्कृतांना गप्प बसवावयाला पहातात. ' तुम्ही खुशाल मुसलमान व्हा. आम्हां स्पृश्यांचें तुमच्यावांचून कांहीं अडत नाहीं. सहा कोटी अस्पृश्यांना आम्ही भावी हिंदूसमाजांतून केव्हांच वजा केलें आहे.' अशी धमकी वजा भाषा वापरणारे ' भाला ' कार तसें करावयाला कां धजतात याचें कारण त्यांनींच सदरील वाक्यांच्या पुढील वाक्यांत दिलें आहे. ते वाक्य हैं ' पण सारेंच अस्पृश्य बाटतील व मुसलमान होतील हें संभवत Tel.’ आम्ही विचारतों तसा संभव असला तर ही तुमची भाषा बदलेल कीं नाहीं ? सहा कोटी अस्पृश्य तुमच्या खिसगणतींत नाहींत; परंतु लक्ष्यांत ठेवा, हे सहा कोटी अस्पृश्य-हिंदूलोक मुसलमान झालें कीं, मुसलमानांबरोबर सामना करितांना या सहा कोटींची भर घालूनच तुम्हांला प्रतिपक्षाच्या संख्याबलाचा हिशोब कारावा लागेल. तुमच्या सध्यांच्या वल्गना बहिषप्कृतवर्गाला चिडविणाऱ्या आहेत. ही तुमची दटावणीची व धमकीची भाषा बहिष्कृत वर्ग केव्हाहि ऐकून घेणार नाहीं. ' नाक दांबल्याशिवाय तोंड उघडत नाहीं ' या आमच्या गेल्या अंकातील अग्रलेखावर टीका करितांना ' भाला ' कार असें दर्शवितात की, आपलें नाक दाबले तरी आपण तोंड उघडणार नाहीं. नका STS, खुशाल जीव द्या ! सर्व अस्पृश्य मुसलमान होतील असें जसें तुम्हाला वाटत नाही त्याच प्रमाणें नाक दाबलें असतां तोंड न उघडण्याचा हट्ट धरून बाकीचा स्पृश्य समाज आत्महत्या करावयाला तयार होइल असे आम्हासही वाटत नाहीं.

प्रासंगिक विचार : बहिष्कृत भारत, ता, १२ जुलै १९२९.