प्रत्यक्ष पाहिलेले एक दृश्य - Page 163

४६

प्रत्यक्ष पाहिलेले एक दृश्य

अस्पृश्यांना मुसलमान होण्याची प्रवृत्ति कां होते, याचे एक उदाहरण नुकतेंच आमच्या दृष्टोत्पत्तीस आलें. धरमतर बंदरावर एक ब्राह्मणाची खाणावळ आहे. या खाणावळीच्या समोर, पावसानें चिखल झालेल्या जागेंत पावसाने भिजत कांहीं मुलांना खाणावळींतलें अन्न वाढण्यांत आलें. चिखलांतून पानें उचलून तीं मुलांनीं दुसरीकडे Ach, व जेथें थोडा बहुत आसरा मिळेल तेथें बसून तें अन्न खाल्लें . तीं मुलें चांगले कपडे घातलेली होतीं आणि तीं ब्राह्मणेत्तर स्पृश्य वर्गातलीं असावी असेंहि एकादा समजला असता. परंतु त्यांना चिखलांत पानें वाढून देण्यांत आली त्यावरून तीं बहिष्कृत वर्गातली असावीं असा आम्हीं तक केला. अशा रीतीनें या हिंदू मुलांना वागविण्यांत आलें, परंतु खाणावळवाला ब्राह्मण मुसलमानांना अशा रीतीनें वागवावयाला धजला असता काय ? आम्हीं चौकशीं केली तेव्हां सदरील खाणावळींत उपाहारगृहाचीहि सोय असून तेथें मुसलमानांना चहापाणी पुरविण्यांत येतें, मुसलमानांकरितां एक स्वतंत्र खोली ठेवून aa बसण्याची सोय केलेली आहे आणि तेथें मुसलमान पांथस्थ चहापान करितात, इतकेंच नव्हे तर बरोबर आणलेल्या अद्राच्या--अर्थातच बहुतकरून त्यांत मांस व मासे असतात--शिदोऱ्या सोडून खातात, असे आम्हांला कळलें. भालाकार प्रभूति टीकाकारानों, तुमचे जातभाई जोपर्यंत वरील प्रकारचें हिंदुसंघटनाप्रेम दाखवित आहेत तोपर्यंत बहिष्कृत वर्गातल्या लोकांना धर्मांतर करुन मुसलमान होणेंच चांगलें असें कां वाटूं नये याचा जबाब देऊ शकाल काय ?

प्रासंगिक विचार : बहिष्कृत भारत, ता. १२ जुलै १९२९.