४७
ब्राह्मणेतर -स्पृश्यांचें परोपदेशे पांडित्यम् |
जळगांवचे” बारा महार मुसलमान झाले त्याबद्दल कोल्हापूरच्या इंग्रजी नांव धारण करणाऱ्या पण मराठी भाषेंत निघणाऱ्या एका ब्राह्मणेतर पत्रानेंडि ^ आपली नापसंती व्यक्त करून अस्पृश्यांना उपदेश करण्याचा आव घातला आहे. सत्यसमाजिष्ट म्हणविणाऱ्या या पत्रकाराला वास्तविक पाहतां या वादांत पडण्याचे कांहीं कारण नव्हतें. अस्पृश्यांनी मुसलमान होण्याच्या भरीस न पडतां देवळांत शिरण्याचा सत्याग्रह करावा आणि आपली अस्पृश्यता दूर करून घ्यावी असें या पत्रकाराचें म्हणणें आहे. तोहि एक मार्ग आहे हें आम्ही नाकबूल. करीत नाही. तो अनुसरण्याचा प्रयत्न आतांपर्यंत बहिष्कृतांनीं केला असून त्यानिमित्त पुष्कळ नुकसानहि त्यांनीं सोसलें आहे. परंतु हा मार्ग दिसतो इतका सोपा आहे काय ? देवळांत शिरण्याचा सत्याग्रह बहिष्कृतांनी ठिकठिकाणीं सुरू केला तर मराठे वगैरे ब्राह्मणेतर स्पृश्य त्यांच्या मदतीला येतील कीं विरोध करतील ? केवळ ब्राह्मणच विरोध करतील असें थोडेंच आहे ! सत्यांग्रहाची
चळवळ केल्यावर मराठे वगैरे लोकांनीं बहिष्कृतांना मारहाण करावी आणि उलट
त्यांच्यावर ब्राह्मण व ब्राह्मणेत्तर स्पृश्यांनी एक होऊन दिवाणी फौजदारी खटले भरावे, आणि सत्यशोधक चळवळीच्या पुढाऱ्यांनी आपल्या जातभाईंना ठपका न देतां फक्त ब्राह्मणांच्या डोक्यावर खापर फोडून मोकळें व्हावें, हा अनुभव आतांपर्यंत आलेला नाहीं काय ? मराठे वगैरे जातींची मनोवृत्ति या बाबंतींत ' परदु:ख शीतळ ' या म्हणीप्रमाणे आहे. त्यांना बहिष्कृतांच्या मानानें सामाजिक विषमता म्हणण्यासारखी कांहींच जाचत नाहीं. पाण्यासाठी उन्हांतून मैलांचे मेल तळतळत त्यांना जावें लागत नाहीं, त्यांच्या मुलांना ब्राह्मणांच्या मुलांबरोबर शाळेत बसावयास हरकत येत नाहीं, धर्मशाळा व देवळें यांत त्यांना कोणी मज्जाव करीत नाहीं. तरी ब्राह्मणांच्या जुलुमाविरूद्ध त्यांची केवढी हाकाटी चालते | आणि पुनः बहिष्कृतांना उपदेश करावयाला हे तयारच |
@ 8 @
* जिल्हा-बुलडाणा.
A खंडेराव गोपालराव बागल यांचे ' हंटर ' नावाचे वृत्तपत्र.
प्रासंगिक दिचार : बहिष्कृत भारत, ता. १२ जुलै १९२९.