४८
शुद्धि कशाकरितां पाहिजे [? ]
शुद्धीच्या चळवळीचे पुरस्कर्ते उदात्त हेतूंनी प्रेरित झालेले नाहींत याची आणखी
एक साक्ष पाहिजे असल्यास ती नुकतीच सांपडली आहे. कर्नाटकांतील एका लिंगायत स्वामींनीं ढोर जातीच्या लोकांची शुद्धि करून त्यांना कोणी अस्पृश्य समजूं नये अशी आपल्या अनुयायांना आज्ञा केली. ही बातमी प्रसिद्ध करतांना कित्येक मराठी वर्तमान पत्रकारांनी, “ स्वामी याऐवजीं मुसलमान व खिस्ती यांची शुद्धि करतील तर बरें होईल, ' अशा अर्थाचे उद्गार काढले आहेत ! हिंदुसमांजांतल्या दलित वर्गाला त्याच स्थितींत ठेवावयाचे आणि बाहेरचे मुसलमान व खिस्ती मात्र शुद्ध करून आंत आणावयाचे असें हें धोरण आहे. जे मुसलमान व खिस्ती शुद्ध होऊन हिंदुसमाजांत येतील त्यांची एक वेगळी जात करावयाची हा डाव पुनः आहेच ! कारण, ज्यांचा इतर जातीशी शरीरसंबंध घडला नसेल व wad अन्नोदक, व्यवहारापुरतीच बाटाबाट झाली असेल त्यांनाच फार तर स्वतःच्या मूळच्या जातींत प्रायश्चित घेऊन सामील होणे शक्य आहे : बाळीच्या शद्धीकतांना स्वतःची वेगळी जात केल्याशिवाय गत्यंतर नाहीं. अर्थात शद्धीची चळवळ ही पूर्णपणे आत्मसात् करण्याची चळवळ नसून ती केवळ संख्याबल वाढविण्याची धडपड आहे. शुद्धिवाद्यांना न्यायाची व समतेची चाड नाहीं, भूतदयेची पर्वा नाहीं ; कसलीहि खोगीरभरतीं करून, हिंदूंची संख्या वाढविणे हेंच त्यांचें ध्येय आहे. शिवाय, एकाद्या लिंगायत स्वामीनें ढोरांना पावन करून आपल्या समाजांत घेतल्याने ब्राह्मणी वर्चस्वाला धक्का बसतो, हेंही 3
अंतःस्थ वैषम्य आहेच |
Sie ise
eo
गि
प्रासंगिक विचार . बहिष्कृत भारत, ता. १२ जुले १९२९.