वतन बिलाची तात्पुरती इतिश्री ! १२५
फेरबदल करण्यांत आल्यामुळें जें बिल महार लोकांना हितावह होणार होतें तेंच त्यांना अनहितकारी बनलें. पैकीं पहिली दुरुस्ती विरुद्ध विशेषसा आक्षेप घेता येण्यासारखा नव्हता कारण बलूता किती मिळतो, कोणत्या कामासाठीं मिळतो या बद्दल रयत महार व सरकार यांच्यात मतभेद असल्याचें सिलेक्ट कमिटीस दिसून आल्यामुळे ह्या मतभेदाचा निकाल लावल्याशिवाय बिलांतील बलूत्याबद्दलचीं कलमें तूर्त कायद्याच्या रूपांत घालूं नयेत असा अभिप्राय सिलेक्ट कमेटींने दिला. व ह्या प्रश्नाचा निकाल लावण्या करिता
बलूता चौकशी कमिटी
नेमण्याचें अभिवचन सरकारनें दिल्यामुळे डॉ. आंबेडकरांनीहि हीं कलमें बिलांतून काढून घेण्यास आपली हरकत नाहीं असें सांगितलें. कारण तसें करण्यांत महार समाजाचे कांहीं नुकसान नव्हतें. दिवसाला दोन दिवस लागले असते इतकाच काय तो फरक पडला असता. दुरूस्ती नंबर दोन मात्र अत्यंत विघातक होती. तिच्यामुळे डॉ. आंबेडकरांनी आपल्या बिलाच्या रूपानें तयार करून
दिलेल्या
गणपतीच्या मूर्तीस माकडाचे रूप
प्राप्त झालें. हेच माकड आतां कौन्सिलपुढें येणार होतें आणि महारांच्या मानगुटीवर बसणार होतें. सिलेक्ट कमिटीनें बदललेले बिल पुनः कौन्सिलमध्ये आल्यावर त्यांतले सिलेक्ट कमिटीचे जांवईशोध काढून टाकून मूळच्या बहुतांशी तरी मूळच्या स्वरूपांत तें पास करून घेण्याची आशा असती तर तें आंबेडकरांनी मागें घेतलें नसतें. परंतु कौन्सिलमघल्या आजच्या परिस्थितींत वरील आशेला बिलकूल जागा नाहीं. निरनिराळ्या हेतूंनी प्रेरित होऊन आंबेडकरांनी सुचविलेली वतन अँक्टाची सुधारणा हाणून पाडण्याकरिता
सरकार, ब्राह्मणेतर, ब्राह्मण व मुसलमान यांचे संगनमत होणार हें त्यांना स्पष्ट दिसून आलें तेव्हां त्यांनी उपकार करावयास जातांना अपकार होण्याचा प्रसंग येऊं नये म्हणून माघार घेतली. ब्राह्मण, ब्राह्मणेतर व मुसलमान सभासदांमधील क्वचित् एकादाच सभासद आंबेडकरांच्या मूळ बिलाला अनुकूल झाला असता. सरकारची तर पहिल्यापासून सहानुभूति नव्हती. महारांना सध्यांच्याच स्थितींत ठेवलें तरच त्यांच्यावरील आपली सुलतानशाही चालू राहील असे बाकीच्यांना वाटतें व म्हणूनच त्यांना वतन
अँक्टामध्ये महारांची गुलामगिरी काढून टाकण्याच्या दृष्टीनें सुधारणा होणें इष्ट
वाटत नाहीं. ब्राह्मण व ब्राह्मणेतर हे आपसांत कितीहि भांडले तरी बहिष्कृत
बाय ६४८-१९ `