. वतन बिलाची तात्पुरती इतिश्री ! १२७
परिस्थितिच अशी जुळून आली की, या वेळीं बिल मागें घेतले नसतें तर भलताच कायदा महार समाजाच्या बोकांडी बसला असता. ही गोष्ट लक्षांत आणून सदरींल बिलाविषयी आस्था बाळगणारे लोक |
| दु:खांत थोडे समाधान
मानतील अशी आशा आहे. हें बिल कौन्सिलमध्यें आणलें तेव्हां वेळ पडल्यास सत्याग्रहाचाहि आश्रय करून तें पसार करून घेण्याचा आंबेडकरांचा संकल्प होता, आणि त्याप्रमाणे कौन्सिलामध्ये त्यांनी एकदा बोलूनही दाखविले होते. बिलाचा उद्देश कोणाही वतनदारावर वतन सोडण्याची सक्ती करण्याचा नव्हता, तर ज्यांना वतनामुळे प्राप्त होणारी गुलामगिरी नको असेल त्यांना सरकारसाच्याची जुडी देऊन आपली वतन जमीन स्वतःपाशी ठेवण्याचा मार्ग मोकळा व्हावा असेच बिलाचें धोरण होतें. तथापि, कित्येक अदूरदर्शी अथवा व्यक्तीद्वेषप्रेरित मंडळीने बिलाविषयी महारसमाजात गैरसमज उत्पन्न केल्याकारणाने सत्याग्रहाचा उपाय अंमलात आणणे अशक्य झाले, महारसमाजाचा बराच मोठा भाग अज्ञान व अशिक्षित असल्यामुळे बिलाविषयी गैरसमज पसरू पाहणाऱ्या लोकांना चांगलेच फावले. तथापि आमची खात्री आहे की, स्वाभिमानाची जागृति समाजात अधिकाधिक. होत असल्यामुळें नवीन पिढी तरी
' वतनदारीचें हांडूक गळ्यांत बांधून मिरविण्यांत भूषण
मानणार नाही. वतनदारीचा पायबंद जोपर्यंत कायम आहे तोंपर्यंत महारसमाजाची व्हावी तंशी प्रगती केव्हांही होऊ शकणार नाहीं. वतनदारीचा शिळा तुकडा चघळण्याची आणि त्याच्याकरिता गुलामगिरीचा पट्टा गळ्यांत बांधून घेण्याची ज्यांना सवय पडलेली आहे, त्यातच ज्यांना धन्यता वाटते, ज्यांच्या अंगांत स्वातंत्र्याची धमक नाही, त्यांच्याकरिता आंबेडकरांचे बिल नव्हते. तसेच त्यांच्या गुलामगिरीच्या आवडीच्या आडही ते येत नव्हतें. तर ज्यांना माणुसकीचे हकक संपादावयाचे आहेत, ज्यांना स्वातंत्र्याची आवड आहे, ज्यांना स्वतःकरिता आणि आपल्या मुलांनातंवाकरितां प्रगतीचा मार्ग मोकळा करून घेण्याची उत्कट इच्छा आहे, त्बांच्याकरिताच आंबेडकरांनी हे बिल आणलें होते. या खेपेस ते यशस्वी झालें नाही तरी स्वत: आंबेडकरांची पूर्ण निराशा झालेली नाही. पुन: योग्य संधी येईल तेव्हा ही सुधारणा घडवून आणण्याचा |
` -डॉ. आंबेडकरांचा निर्धार कायम
आहे. तोंपर्यंत महारसमाजातील स्वाभिमानी लोकांनी प्रबळ लोकमत तयार करून वेळ पडल्यास सत्याग्रह एकमतानें होईल अशासाठी शिकस्तीचे प्रयत्न करावे. अशाप्रकारच्या सुधारणा चुटकीबरोबर होत नसतात. सरकार काय